उर्फीने कपड्यांऐवजी गुंडाळल्या तारा, पाहा व्हिडीओ

मुंबई | अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आपल्या फॅशन आणि कपड्यांमुळे नेहमी चर्चेत असते. उर्फीने आतापर्यंत रोजर, कैडी, काचा, ब्लेड आणि इतर धातूपासून बनविलेले कपडे घालून फोटोशूट केले आहे.

उर्फीने नुकताच तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात व्हिडीओत उर्फीने शरीरावर तारा लपेटल्या आहेत. आणि शरीर झाकण्यासाठी त्वचेच्या रंगाचा (Skin Color)एक ड्रेस घातला आहे.

या व्हिडीओनंतर नेटकरी तिची तुलना बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) न्यूड फोटोशूटसोबत करत आहेत.  उर्फीने या व्हि़डिओवर आता स्पष्टीकरण दिलं आहे.

या फोटोशूटवेळी उर्फीने भरपूर दागिने परिधान केले असून केस वर बांधले आहेत. तिच्या या व्हिडीओवर चाहते कमेंटचा पाऊस पाडत आहेत. तर काही नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

उर्फीने एक इन्स्टाग्राम पोस्ट करत यामागची कारणे सांगितली आहेत. त्यात तिने तिच्या या अजब-गजब ड्रेसिंगमागची कारणे सांगितली आहेत.

उर्फी म्हणाली, सदर व्हिडीओमागे एक कारण आहे. ज्याप्रकारे भारतीय विवाहांमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात दागिने दिले जातात आणि त्यांना फुलांनी सजविले जाते. परंतु वास्तविक त्यामुळे त्यांना स्वत:चा तोल देखील सांभाळता येत नाही. आणि त्या नीटपणे चालू शकत नाहीत.

हा व्हिडीओ आताच्या पिढीसाठी नसून जुन्या पिढीतील महिलांसाठी असल्याचंही उर्फी म्हणाली.  अतरंगी कपड्यांमुळे उर्फी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.

पाहा व्हिडीओ-

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

महत्वाच्या बातम्या –

हल्ल्यानंतर उदय सामंत आक्रमक, ट्विट करत म्हणाले….

उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला, नवा वाद पेटणार?

“कोरोना लसीकरण मोहीम संपल्यावर लगेच CAA लागू करणार…”

टीकेनंतर एकनाथ शिंदे उद्यानाच्या नावात बदल; आता ‘हे’ नाव देणार

अजित पवारांनी उडवली शिंदे सरकारची खिल्ली, म्हणाले…