उर्फीचा अनोखा अंदाज! नेटकरी म्हणाले, “आधी नशा करणं बंद कर”

मुंबई | सिनेमासृष्टीत आपल्या अभिनयानं कमी आणि इतर कारणानं प्रसिद्ध असणाऱ्यांची कमी नाही. काही ना काही करून प्रसिद्ध होणाऱ्या अनेकजणांना सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळते.

सातत्यानं चित्र विचित्र कपड्यांवरून आणि आगळ्या-वेगळ्या अंदाजांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी अभिनेत्री म्हणून उर्फी जावेदला ओळखलं जातं.

उर्फीला तिच्या कपड्यांवरून अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे. आता उर्फीला तिनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळं ट्रोल करण्यात येत आहे.

उर्फीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे त्या व्हिडीओत उर्फीला स्वत:चा तोल सांभाळता आला नाही. मग उर्फीनं हा व्हिडीओ शेअर करताना युझर्सना असं तोल जाण्याला काय म्हणालं?, असा प्रश्न विचारला आहे.

मेकअप किट घेेऊन फोटोशूट करत असताना उर्फी वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर तोल गेल्याचं हसू होतं परिणामी तिनं हा व्हिडीओ लगेच इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करत उर्फीने एक प्रकारे ट्रोल करणाऱ्यांना आमंत्रणच दिलं आहे. तिच्या कॅप्शनमुळं तिला जास्त ट्रोल करण्यात आलं आहे. परिणामी ट्रोल करणाऱ्यांची रांग लागली आहे.

एका युझरनं तिला खुप भारी टोमणा मारला आहे. नशा करणं बंद कर मग तुला आपोआप कळेल तु काय करत आहेस, अशी कमेंट युझरनं केली आहे. सध्या ही कमेंट देखील व्हायरल होत आहे.

दरम्यान, उर्फीला मात्र या ट्रोलर्सबद्दल अजिबात काहीच वाटत नाही. मला ट्रोल करणाऱ्यांकडं मी लक्ष देत नाही. मला बीग बाॅस ओटीटीनंतर ओळख मिळाल्याचं उर्फीनं काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.

पाहा व्हिडीओ – 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Urrfii (@urf7i)

महत्त्वाच्या बातम्या – 

 मुख्यध्यापकाच्या ऑफिसमध्ये राडा, बोलता बोलता झालं असं की…; पाहा व्हिडीओ

रावसाहेब दानवेंना जोर का झटका; सोयगाव नगरपंचायतीत शिवसेनेनं मारली बाजी 

नारायण राणेंना शिवसेनेचा ‘दे धक्का’, शेवटच्या क्षणी एका आकड्याने… 

ज्युनिअर आर. आर. पाटलांचा धमाका, एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना ‘बाप’ दाखवला! 

रोहित पवारांचा राम शिंदेंना धक्का; कर्जत नगरपंचायतीवर मिळवली एकहाती सत्ता