Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

‘उर्मिला मातोंडकर एक सॉफ्ट पॉर्नस्टार आहे’; कंगना पुन्हा बरळली

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर बॉलिवूडची ड्रामा क्वीन कंगना रानौत चांगलीच चर्चेत आहे. कंगनानं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर अनेक शिवसेना नेत्यांनी कंगनावर तोफ डागलली होती. कंगनानं बॉलिवूडमध्ये चालणाऱ्या अं.मली पदार्थ प्रकरणावरुनही अनेकांवर निशाणा साधला आहे. कंगनानं केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील कंगनावर टीका केली आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीही या वा.दात उडी घेत कंगनावर निशाणा साधला होता.

कंगनाच्या ऑफिसवर झालेली कारवाई निंदनीय आहे. त्या कारवाईला माझा अजिबात पाठींबा नाही. पण कंगनाला पुरवलेली वाय प्लस सुरक्षा आमच्या पैशातून आहे. भाजपकडून निवडणूची उमेदवारी मिळवण्यासाठी ती त्यांना खूष करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका उर्मिला मातोंडकर यांनी कंगनावर केली होती. उर्मिला मातोंडकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना कंगनानं उर्मिला यांची तुलना ‘सॉफ्ट पॉर्नस्टार’ बरोबर केली आहे.

उर्मिला मातोडकर एक सॉफ्ट पॉर्नस्टार आहे. मला माहितेय की हे अतिशय लज्जास्पद आहे. पण उर्मिला निश्चितच तिच्या अभिनयासाठी प्रसिध्द नाही, असं कंगनानं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

तसेच उर्मिला मातोंडकर कशासाठी ओळखले जाते? सॉफ्ट पॉर्नसाठी बरोबर ना? जर तिला तिकीट मिळू शकतं तर मला का नाही मिळणार?, असा सवालही कंगनानं केला आहे. तसेच उर्मिला मातोंडकर यांनी संपूर्ण मुलाखतीत आपल्या संघर्षाचा अवमान केल्याचा दावाही कंगनानं केला आहे.

दरम्यान, संपूर्ण देश ड्र.ग्जच्या विळख्यात आहे. हिमाचल प्रदेश हे ड्र.ग्जचे उगमस्थान असल्याची कंगनाला कल्पना आहे का? कंगनानं प्रथम तिच्या स्वतःच्या राज्यातून सुरुवात केली पाहिजे. तसेच कंगनानं पुढं येवून ड्र.ग्जचं सेवन करणाऱ्या लोकांची नावे द्यावीत. यासाठी तुला थंब्ज अप देणारी मी पहिली व्यक्ती असेल, असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं होतं.

काही दिवसांपूर्वी कंगनानं जेव्हा काश्मीरची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती तेव्हाही उर्मिला मातोडकर यांनी कंगनावर निशाणा साधला होता. मुंबई लाखो लोकांचे पोट भरते केवळ कृतघ्नच तिची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करू शकतात, असं ट्वीट उर्मिला यांनी केलं होतं. उर्मिला यांच्या या ट्वीटनंतर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी उर्मिला यांना पाठींबा दर्शवला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

पवना डॅमवर झिंगाट पार्ट्या, सुशांत ‘या’ अभिनेत्र्यांना घेऊन यायचा; बोटचालकांची माहिती

ड्र.ग्ज पार्टी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार; ‘या’ सात बड्या कलाकारांची नावं गोत्यात!

दिशाचा मित्र गायब आहे का?; सेक्युरिटी गार्डनं केला मोठा खुलासा

अंकिता लोखंडेवर भडकले चाहते; ‘या’ कारणामुळे सोशल मीडियावर जोरदार ट्रोल!

संबित पात्रांनी विचारला POK चा फुलफॉर्म; ‘या’ अभिनेत्रीला देता आलं नाही उत्तर!