“अध्यक्ष महोदय याच महाराष्ट्रात…”, उर्मिला मातोंडकरांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

मुंबई | विधानसभेत राडा घालणाऱ्या 12 आमदारांचं तालिका अध्यक्षांनी निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर निलंबित आमदारांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.

सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय देत 12 आमदारांचं निलंबन अखेर रद्द केलं आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर आता शिवसेनेनेच्या नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

12 आमदारांचे बेकायदेशीर निलंबन रद्द ठरविणारा, लोकशाही वाचविणारा आणि ऐतिहासिक निकाल असल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं. त्यावर, अभिनंदन! लोकशाही वाचली याचा आनंद आहे, असा टोला उर्मिला मातोंडकर यांनी लगावला आहे.

कुठलेही कारण नसताना आणि इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी निलंबन हे असंवैधानिक आहे, असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर देखील उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर दिलंय.

अध्यक्ष महोदय याच महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्तीच होत नाहीये. त्यावरही शेभेकरता का असेना कधीतरी आवाज उठवा, असा टोला उर्मिला मातोंडकर यांनी फडणवीसांना लगावला आहे.

केवळ 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न नव्हता तर त्या मतदारसंघातील 50 लाखाहून अधिक मतदारांचा प्रश्न होता, असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर देखील मातोंडकरांनी रोखठोक उत्तर दिलंय.

इथे फक्त 50 लाख नाही तर महाराष्ट्राच्या तमाम 12 करोडपेक्षा जास्त जनतेच्या हक्काचा प्रश्न आहे, असंही मातोंडकर म्हणाल्या आहेत. शोभेकरता म्हणजे शोभा पण लाजली वाटतं, अशी मिश्किल टीका उर्मिला यांनी केली आहे.

दरम्यान, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उर्मिला मातोंडकर अॅक्टिव नसल्याचं पहायला मिळालं होतं. मात्र, आता त्यांनी थेट फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

अखेर समंथा नागा चैतन्यच्या घटस्फोटावर नागार्जुनने सोडलं मौन, म्हणाला “समंथाला…”

महाराष्ट्राच्या चित्ररथावरून वाद, सोशल मीडियावर नाराजीचा सूर

पदोन्नती आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

12 आमदारांचं निलंबन रद्द! देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

BREAKING: ठाकरे सरकारला मोठा धक्का, 12 आमदारांचं निलंबन अखेर रद्द