नवी दिल्ली | युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक कठोर निर्बंध लादले आणि तेथून कच्चे तेल आणि इतर वस्तूंच्या आयात-निर्यातीवर बंदी घातली आहे.
भारत रशियाकडून कच्च तेल आणि इतर वस्तू आयात करत आहे. या मुद्द्यावर अमेरिकेने प्रतिक्रिया दिली आहे. व्हाईट हाऊसने सोमवारी सांगितलं की, रशियाकडून ऊर्जा आणि इतर वस्तूंच्या आयातीला गती देणं किंवा वाढवणं भारताच्या हिताचं नाही.
अमेरिकेने भारताला मॉस्कोवरील अवलंबित्व कमी करण्याची आणि अमेरिकेच्या मदतीसाठी काम करण्याची ऑफर दिल्याची माहिती आहे.
गेल्या आठवड्यात भारतीय-अमेरिकन सल्लागार दलीप सिंग यांच्या नवी दिल्ली भेटीबाबत तपशील देताना, व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जेन साकी यांनी पत्रकारांना सांगितलं की त्यांनी अमेरिकेच्या निर्बंधांचं स्पष्टीकरण दिलं आणि कोणत्याही देशाने किंवा संस्थेने त्याचं पालन केलं पाहिजे असा पुनरुच्चार केला.
भारत भेटीदरम्यान त्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना सांगितलं की, रशियाकडून ऊर्जा किंवा इतर वस्तूंची आतया वाढवणं हे भारताच्या हिताचं नाही.
दरम्यान, अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलीप सिंग यांनी रशियावर अमेरिकेचे निर्बंध लादण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
पुढील 4 दिवस महत्त्वाचे! कडाक्याच्या उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा इशारा
गडकरी म्हणाले, “रोहित तू बिंधास्त जा, तुझं काम झालंच म्हणून समज”
ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“पैसे जपून खर्च करा, चिकन खरेदी करायला गेलात तरी भाजप ईडीला कळवेल”
लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती आली समोर, रेल्वेनं घेतला मोठा निर्णय