आणखी बळी जातील पण अर्थव्यवस्थेला चालना देणं महत्वाचं- डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन | कोरोना व्हायरसमुळे जास्त नागरिक आजारी पडले किंवा मृत्यू झाले तरी अमेरिकन नागरिकांनी त्यांचं दैनंदिन कामकाज सुरु करावं, असं वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.

एरिझोना प्रांतातील फोनिक्स शहरामध्ये ते बोलत होते. महिन्याभरानंतर वॉशिंग्टनबाहेर त्यांचा हा पहिलाच दौरा होता. कोरोना व्हायरसविरोधात आता दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरु असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं आहे.

कोरोना व्हायरसविरोधात व्हाइट हाऊसने एक टास्क फोर्स बनवली आहे. यात आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे. ही टास्क फोर्स विसर्जित करण्यात येणार आहे.

कोरोना व्हायरसच्या फैलावावर नियंत्रण मिळवल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिका आता कोरोना व्हायरसविरुद्ध लढाईच्या पुढच्या टप्प्यात आहे. हा सुरक्षित टप्पा असून, हळूहळू काही गोष्टी सुरु होतील, असं ट्रम्प म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्रातली परिस्थिती चिंतेची, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार- केंद्रिय आरोग्यमंत्री

-शाहू राजांचा फडणवीसांकडून कार्यकर्ता म्हणून उल्लेख; ट्रोल झाल्यावर पोस्ट केली डिलीट

-….तरच दारूविक्री सुरू ठेवावी- पृथ्वीराज चव्हाण

-कोरोनाने देशातला विक्रम मोडला; आतापर्यंतची सर्वाधिक रूग्ण तसंच मृत्यूंची नोंद…!

-पुण्यातील ‘गोल्ड’मॅन कायमच हरले आयुष्याची लढाई