Skin Care | दुधाचे हे फेसपॅक वापरा आणि मिळवा तजेलदार त्वचा!

मुंबई | हिवाळ्यामध्ये (Winter Season) त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. सामान्य त्वचा, कोरडी त्वचा आणि सेन्सिटिव्ह त्वचा हे त्वचेचे तीन प्रकार आहेत.

थंडीमध्ये जर तुम्ही केमिकल्स असणाऱ्या प्रोडक्टचा वापर केला तर तुम्हाला रॅश येणे (Skin Rashes)आणि त्वचा कोरडी पडणे या समस्या जाणवतील. जर तुम्हाला मुलायम आणि चमकदार त्वचा हवी असेल तर तुम्ही दूध चेहऱ्यावर लावावं.

दुधामध्ये असणारे लेक्टिक अॅसिड स्किनमधील सेल्सला हेल्दी ठेवतात. तसेच त्वचेमधील मेलेनिनच्या प्रॉडक्शनला संतुलित ठेवण्याचे काम दूध करते. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी तसेच डेड स्किन घालवण्यासाठी चेहऱ्याला दूधा लावावे.

हळद आणि दुध मिक्स करून तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. दूध आणि हळदची ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानंतर चेहरा 20 मिनीटांनंतर कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून तीन वेळा हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. त्यामुळे डार्क सर्कल्स कमी होतात आणि त्वचा तजेलदार होते.

प्पल फेस पॅकचा (Apple Face Pack)वापर करू शकता. ड्राया स्किनसाठी वेगळ्या प्रकारे अ‍ॅप्पल फेस पॅक तयार करा. त्यासाठी सर्वप्रथम एक सफरचंद घ्या. तो सफरचंद मिक्समध्ये बारीक करून घ्या.

एक चमचा ग्लिसरीन आणि एक चमचा गुलाब पाणी टाका. या सर्व गोष्टी मिक्स करून त्याचा पॅक तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्याला लावा. त्यानंतर 20 मिनीटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा.

रोज सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम चेहरा कोमट पाण्याने धुवा. चेहरा धुताना फेसवॉशचा वापर करा. चेहरा धुताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करा. थंड पाण्याचा वापर चेहरा धुण्यासाठी केल्याने त्वचा कोरडी पडते.

महत्वाच्या बातम्या-

“आम्हाला कुणी विचारत नाही, घर की मुर्गी दाल बराबर असं झालंय” 

“सर्वसामान्य माणूस प्रचंड गोंधळलेलाय, राज्यात सगळा सत्यानाश सुरुय” 

‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 50 लाख 

राज्यातील दारूची दुकानं बंद होणार?; राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य 

सिंधुताईंच्या ‘त्या’ इच्छेची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; घेतला मोठा निर्णय