मुंबई | भारतात फेसबुक वापरकर्त्यांबरोबरच आता इंस्टाग्राम वापरणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. त्यात तरूण आणि तरूणींचा संख्या सर्वाधिक आहे. सद्य स्थितीत फेसबुकमध्ये सर्वाधिक जाहिराती दाखवण्यात येत आहेत.
आता फेसबुकचा प्लॅटफॉर्म असणाऱ्या इंस्टाग्रामने पैसे उभा करण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनी आता इंस्टाग्रामच्या सबस्क्रिप्शन फिचरवर काम करत असल्याची माहिती समोर येत आहे.
इंस्टाग्रामच्या या नविन फिचर्सनुसार युजर्सना कंटेट अॅक्सेस मिळवण्याकरिता प्रत्येक महिन्याला 89 रूपये मोजावे लागणार आहेत. इंस्टाग्राम ही नविन योजना जे लोक इंस्टाग्रामवर व्हिडीओ बनवून टाकतात त्यांना याचा भविष्यात फायदा होणार असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.
फेसबुक कंपनी पैसे उभा करण्याची सुरूवात आता इंस्टाग्रामपासून करणार असल्याचं दिसत आहे. इन्फ्ल्यूएन्सर आणि इंस्टाग्राम व्हिडीओ बनणारे यांचा फायदा होईल असा युक्तीवाद कंपनीकडून करण्यात येत आहे.
मात्र, कंपनीच्या सदर युक्तीवादावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय. इंस्टाग्राम वापरल्यानंतर कंपनीच्या डेटामधुन कंपनीला पैसे मिळतात तर अधिक सबस्क्रिप्शनची कंपनीला काय गरज आहे? असे सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत.
यासंदर्भात Aleesandro Paluzzi इंस्टाग्राम सबस्क्रिप्शनच्या बाबत काही ट्विट केले आहेत. इंस्टाग्राम क्रीएटर्स प्रोफाईल वर दिसणाऱ्या सबस्क्रिप्शन बटणाची चाचणी देखील करत आहे.
जर तुम्ही 89 रूपये भरून सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला एक बॅज मिळू शकतो. ज्यावेळेस तुम्ही इतर व्यक्तींना मेसेजेस कराल तेव्हा हा बॅज तुमच्या युजर नेम समोर दिसणार आहे.
इंस्टाग्रामचे हे फिचर इच्छिक असण्याची शक्यता आहे. याअगोदर ट्विटरने देखील Twitter Blue तसेच Super Fallow असे फिचर्स लॉन्च करण्यात आले होते.
त्यानंतर आता युजरला कोणत्याही अकाउंटच्या विशिष्ट कंटेट अक्सेस करण्यासाठी सबस्क्रिप्शन द्यावं लागणार आहे.
दरम्यान, टिकटॉक बंद पडल्यानंतर देशात इंस्टाग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला. भविष्यात कंपनीने जर सबस्क्रिप्शन फिचर सुरू केले तर तरूणांची अडचण होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रामदास कदमांचा पत्ता कट? ऑडिओ क्लिप प्रकरण भोवण्याची शक्यता
ठाकरे सरकारचा फडणवीसांना दणका! आता ‘या’ प्रकरणाची चौकशी होणार
मोठी बातमी! शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत राजभवनावर; राजकीय घडामोडींना वेग