नैसर्गिक पद्धतीनं त्वचा निरोगी राहण्यासाठी करा संत्र्याच्या सालीचा वापर, मिळतील ‘हे’ लाभ

मुंबई| संत्र्याची साल तुम्ही टाकून देत असाल तर ती वाया जाऊ न देता तुमच्या त्वचेसाठी उपयोगाची आहे. संत्र्याच्या सेवनामुळे आपल्याला आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक देखील लाभ मिळतात. संत्र्याच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात सौंदर्यवर्धक गुणधर्मांचा साठा आहे. तुमच्या त्वचेला तजेला आणण्याचे काम संत्र करत असते. त्यातील पोषक घटक आपली त्वचा निरोगी बनवते आणि चेहर्‍यावर नैसर्गिक चमक देखील येते.

1. तुमच्या त्वचेसाठी व्हिटॅमिन-सी चांगलं असतं. व्हिटॅमिन-सी त्वचेला लागणारं एक प्रकारचं औषधच आहे. संत्र्यामध्ये विटॅमीन-सीचं प्रमाण जास्त असते.

2. संत्र्याच्या सालीमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ची मात्रा भरपूर असते. यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल, नैसर्गिक स्वरुपात तेलाचा होणारा अतिरिक्त स्त्राव नियंत्रणात आणण्याचे गुणधर्म, अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-मायक्रोबियल यासह अनेक गुणधर्म आहेत .

3. कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह व ‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्वे या शरीररक्षक अन्नघटकांनी संत्रे परिपूर्ण असल्याने निरोगी राहण्यासाठी व शरीराच्या वाढीसाठी ते बहुमोल आहे. संत्र्यामध्ये सर्वात जास्त कॅल्शिअम असते. याशिवाय संत्र्यामध्ये आद्र्रता, प्रथिने, तंतुमय व पिष्टमय पदार्थही असतात.

4. तुमच्या त्वचेला नैसर्गिक पद्धतीने ग्लो आणण्याचे काम करते. त्यामुळे संत्री असलेल्या ब्युटी प्रोडक्टचा वापर नक्की करुन पाहा. याशिवाय तुम्ही कोणत्याही फेशियल ट्रिटमेंट निवडताना त्यामध्येही संत्र्याच्या फ्लेवररची निवड करु शकता.

5. संत्र्याची साल सुकवून त्याची मिक्सरमध्ये बारीक पावडर करायची. त्यानंतर पावडरमध्ये मध आणि कच्चे दूध मिसळून घ्यावं आणि तयार झालेला लेप चेहऱ्यावर लावावा. व्यवस्थित सुकल्यावर स्वच्छपणे चेहरा धुवून घ्या. आठवड्यातून एकदा हा लेप लावल्यानं चेहऱ्यावर चमक येते.

6. संत्र्याच्या सालीचे सिरम वापरु शकता. त्यामुळे तुमचे ओपन पोअर्स कमी होतील. तुमचे पोअर्स कमी झाल्यामुळे तुम्हाला होणारा पिंपल्सचा त्रासही कमी होईल.

7. त्वचेवर नैसर्गिक तेज येईल आणि त्वचा सैल देखील पडणार नाही. तसंच मुरुम आणि ब्लॅकहेड्सची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळू शकते.

8. वाढत्या वयाबरोबर चेहऱ्यावर येणाऱ्या फोडांचं प्रमाण वाढत जातं. शरीरात हिटचं प्रमाण वाढलं की फोड येतात. संत्र्याच्या सालीचा लेप त्यावर थंड आराम देतो. अशा वेळी संत्र्याच्या सालीचे लेप चेहऱ्यावर लावल्यानं चेहरा अधिक उजळतो.

महत्वाच्या बातम्या – 

400 दिवस रुग्णांची सेवा करुनही कोरोना ‘या’…

लग्नापूर्वी केलेल्या ‘त्या’ मोठ्या विधानावरून अनुष्काचा ‘यु टर्न’; व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडचं हे सुपर हॉट कपल लवकरंच विवाह बंधनात अडकणार?

सलाम! हॉस्पिटलला आग लागली तरी देखील डॉक्टर रुग्णाची सर्जरी करतच राहिले; पाहा व्हिडीओ

सोने पे सुहागा! ऐन लग्नाच्या सिझनमध्ये सोनं आणखी उतरलं; वाचा आजचा दर

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy