मोबाईल स्लो झाला असेल तर या 3 ट्रिक वापरा; अगदी नवीन मोबाईलसारखा चालेल!

नवी दिल्ली | सध्या कोरोना संकटामुळे सर्व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे बहुतांश जणांची सर्व कामं आता मोबाईलवरूनच होत आहेत. अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत, तर विद्यार्थी घरी बसून मोबाईलवर ऑनलाईन लेक्चर करत आहे, त्यामुळे सर्वजणच मोबाईलवर अवलंबून असल्याचं चित्र आहे.

असं असलं तरी कधीतरी काही कारणास्तव मोबाईल हँग होतो किंवा अन्य काही कारणांनी तो खूपच हळू चालू लागतो. या अडचणींना दूर करण्यासाठी आता आम्ही तुम्हाला तीन गोष्टी सांगणार आहे, ज्यांचा तुम्हाला चांगलाच फायदा होऊ शकतो.

आपण केलेल्या काही चुकांमुळेच मोबाईलचा वेग कमी होत असतो. वेगवेगळ्या कारणांसाठी आपण खूप सारे अ‌ॅप वापरत असतो, पण आपण ते प्रत्येक वेळीच वापरतो, असं मुळीच नाही. आपण जेव्हा गरज असेल तेव्हाच त्यांचा वापर करत असतो.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या मोबाईलच्या स्टोरेजनुसारच अ‌ॅप इंस्टॉल करायला हवेत. कारण काही अ‌ॅप्स आपण फक्त काही कारणांपुरतेच वापरतो, मोबाईलमध्ये जास्त अ‌ॅप असल्यामुळे त्याचा वेग कमी होतो आणि मग तो खूपच हळूहळू चालू लागतो.

जर तुमचा मोबाईल खूपच हळू चालत असेल तर मोबाईलमधील सर्व अ‌ॅप तुम्ही एकदा तपासून पाहा. त्यातील कोणते अ‌ॅप तुमच्या गरजेचे आहे, तेवढेच अ‌ॅप ठेवा. बाकीचे तुम्हाला न लागणारे अ‌ॅप अनइंस्टॉल करा. यामुळे मोबाईलमधील स्टोरेजचे प्रमाण वाढेल आणि वेग सुधारेल.

आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण खूप सारे अ‌ॅप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेले असतात. त्या सर्व अ‌ॅप आपण जेव्हा वापरत असतो तेव्हा हे अॅप्स कॅचे डाटा जमा करत असतात. अॅप जेवढं जुनं होत जातं तसतसा हा कॅचे डाटा वाढतच जात असतो आणि पर्यायाने आपली मेमरी व्यापत असतो.

तुम्ही जे अ‌ॅप नेहमी वापरता, त्यांचा कॅचे डेटा नियमित साफ करत राहा. यासाठी तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जा. तिथं तुम्हाला अॅप्समध्ये सारे अॅप्स पहायला मिळतील. प्रत्येक अॅपमध्ये जाऊन तुम्ही त्या अॅपचा कॅचे डाटा साफ करु शकता. हा डाटा तुम्ही नियमितपणे साफ करत रहाल तर तुमच्या मोबाईलचा वेग नक्कीच वाढेल.

आपण मोबाईल वापरत नसलो तरीही काही अ‌ॅप मल्टिटास्किंगद्वारे बॅकग्राउंडमध्ये चालू असतात. हे अ‌ॅप थेट आपल्या मोबाईलच्या कार्यक्षमतेवर परिणाम करत असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही अ‌ॅप वापरत नसाल तेव्हा ते अ‌ॅप बंद करा.

आम्ही तुम्हाला तुम्हाला सांगितलेल्या या तीन गोष्टींमुळे तुमच्या मोबाईलची कार्यक्षमता आणि मोबाईलचा वेग टिकून राहण्यास मदत होईल. मात्र तुम्ही या गोष्टी काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे, जर तुम्ही या सर्व गोष्टी पाळल्या तर तुमचा मोबाईल अगदी नव्या मोबाईलसारखा नक्कीच चालेल.

महत्त्वाच्या बातम्या-

सक्सेस मिळत गेलं तसतशी श्रद्धा कपूर… जया साहानं केले धक्कादायक खुलासे

“नवाजुद्दीन सिद्दीकीनं माझी फ.सवणूक करून माझ्यावर बला.त्कार केला”

आता रियानं सुशांतवरच केला धक्कादायक आरोप; म्हणते, सुशांतने आपल्या जवळच्या लोकांचा…

सुशांतच्या मृ.त्यूचं गूढ अखेर उलघडलं, सीएफएसएलनं दिला अंतिम अहवाल

कंगनाला मोठा झटका! ‘या’ प्रकरणी कंगनाचीही चौकशी होणार?