मुंबई : #MeToo मोहिमेवर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी टीका केली आहे. आजकाल जमानाच बदललाय. सगळ्या पोरी तयारीने येतात. कायपण करा पण आम्हाला काम द्या, त्यामुळे मी कधीही पोरांना बोलणार नाही, असं उषा नाडकर्णी यांनी म्हटलं आहे.
तुम्ही जास्त जवळीक केली आणि त्यांनी चुकून केलंच तर तुमच्यात धमक पाहिजे दोन कानशिलात मारुन यायची, असं उषा नाडकर्णी म्हणाल्या आहेत.
आमच्या का नाही कोण इतक्या वर्षात वाटेला गेलं? तेवढी केलीय निर्माण, नको उषाच्या बाजूला नको… इथं पोरीपण तसल्याच आहेत. पोरी रागवल्या तरी मला काही वाटणार नाही, असं त्या म्हणाल्या.
आमच्या काळातही हे चालत होतं. फक्त तेव्हा कुणी बोलत नव्हतं. आता बोलतात, ही बोलली की ती… ती बोलली की ही… ती बोलली की तो… गट्स पाहिजेत बोलायचे. तुमच्यावर झालं ना ते तर तेव्हाच बोला आणि जा पोलीस स्टेशनला, असं उषा नाडकर्णी म्हणाल्या.
दरम्यान, नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांबद्दल उषाताईंना विचारण्यात आलं. तेव्हा मात्र त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला. मी कोणावर बोलणार नाही. मी आपलं नेहमीचं जे आहे ते सांगितलं. याचं काय त्याचं काय मला नाही जमणार, असं त्या म्हणाल्या.