मुंबई | अभिनेता सुशांतच्या मृत्यूबाबत अनेक चर्चा सुरु आहेत. सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूबाबत पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरुच राहणार असल्याचं कळतंय.
सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्या प्रकरणाचा आता नव्याने तपास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर सुशांत याची जवळची मैत्रीण रियाचा पोलीस उद्या जबाब नोंदवणार आहेत.
सुशांतने आत्महत्या केली आहे. मात्र, याबाबत अनेक शंका व्यक्त केल्या जात आहे. सुशांतचा मैत्रिणीसोबत वाद झाला होता. यामुळे त्याने आत्महत्या केली असल्याचंही बोललं जात आहे.
सुशांतला गेल्या तीन महिन्यापासून काहीच काम नव्हते. यामुळे त्याच्याकडे पैशांची चणचण निर्माण झाली होती. यामुळे तो तणावाखाली होता, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-असाही एक मुख्यमंत्री, स्वत:च्या सासऱ्यांचं निधन झालं असताना उद्धव ठाकरेंनी नियोजित बैठक घेतली!
-अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
-सुशांतच्या आत्महत्येला हेच लोक कारणीभूत आहेत- कंगना रणौत