Top news मनोरंजन

अनुरागवर लैं.गिक छ.ळाचा आरोप करणाऱ्या पायलचा ‘त्या’ वक्तव्यावरून यूटर्न, माफी मागायलाही तयार

मुंबई | अभिनेत्री पायल घोषनं काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लै.गिं.क छ.ळाचा आ.रोप केला होता. अनुराग कश्यप माझ्यासमोर न्यू.ड झाले होते, असं म्हणत पायलनं अनुरागवर अनेक गं.भीर आ.रोप केले होते. पायल घोषनं 22 सप्टेंबर रोजी वर्सोवा पोलीस ठाण्यात अनुराग कश्यप विरुद्ध दखलपात्र गु.न्हा दाखल केला होता.

यानंतर पायलनं एका मुलाखती दरम्यान ऋचा चड्ढाच नाव घेत अनुरागनं आपला विनयभंग केल्याचं म्हटलं होतं. अनुरागनं मला घरी बोलावून न.शेत माझ्यावर जबरदस्ती केली. जेव्हा मी त्याला विरोध केला तेव्हा अनुरागनं ऋचा चड्ढा, माही गील, हुमा कुरैशी यांसारख्या अभिनेत्रींची नावं घेतली होती, असं पायलनं या मुलाखती दरम्यान म्हटलं होतं.

पायलला मुलाखती दरम्यान ऋचाचं नाव घेणं फारच महागात पडलं आहे. पायलनं केलेल्या वक्तव्यानंतर ऋचानं तिच्याविरुध्द मुंबई उच्च न्यायालयात मानहा.नीचा दावा दाखल केला आहे. ऋचा हाय कोर्टात पोहचल्यानंतर पायलनं आपण केलेल्या वक्तव्यापासून माघार घेतली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात ऋचाच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी पायलच्या वकिलांनी पायल ऋचाची त्या वक्तव्यासाठी माफी मागायला तयार असल्याचं सांगितलं. ऋचा चड्ढाबाबत पायलनं केलेल्या वक्तव्यावरून पायल घोष ऋचाची माफी मागायला तयार आहे, असं ऋचाच्या वकिलांनी नायालयात म्हटलं आहे.

ऋचानं पायलविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेत पायल आपल्यावर बिनबुडाचे आ.रोप करत आहे, असं म्हटलं होतं. मी एक महिला आहे आणि प्रत्येक महिलेला योग्य तो आदर मिळायला हवा. पण एखाद्या महिलेनं दुसऱ्या कोणत्या महिलेवर बिनबुडाचे आरोप करण्यापूर्वी विचार करायला हवा, असं ऋचानं याचिकेत म्हटलं आहे.

दरम्यान, 2 सप्टेंबरला अनुराग विरोधात पायलनं एफ.आय.आर. दाखल करूनही पोलिसांनी अनुराग विरुद्ध कोणतीच कारवाई केली नव्हती. यामुळे पायल 27 सप्टेंबरला पुन्हा वर्सोवा पोलीस ठाण्यात गेली होती.

जर पोलिसांनी अनुराग विरोधात का.रवाई केली नाही तर मी उपोषण करेल, असा इशारा पायलनं यावेळी पोलिसांना दिला होता. यानंतर वर्सोवा पोलिसांनी अनुरागला समन्स बजावत 1 ऑक्टोबरला वर्सोवा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावलं होतं. 1 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजताच्या सुमारास अनुराग कश्यप वर्सोवा पोलीस ठाण्यात हजर झाला होता.

चौकशी दरम्यान अनुरागनं पायल घोषने केलेले सर्व आरो.प खोटे आहेत, असं म्हटलं होतं. तसेच पायलनं ज्यावेळी तिचा छ.ळ झाला आहे असं म्हटलंय त्यावेळी आपण भारतात नव्हतोच असंही अनुरागनं चौकाशी दरम्यान म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

नेहा कक्करच्या लग्नाची वार्ता ऐकताच नेहाचा एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहली म्हणाला…

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! रियाच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाचा निर्णय

बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का! ‘या’ बड्या दिग्दर्शकाचं नि.धन

नोरा फतेहीचा ‘प्यार दो, प्यार लो’ गाण्यावर जलवा, असा डान्स तुम्ही पाहिलाच नसेल!

स्पर्धेच्या मध्यातच दिल्लीच्या संघानं बदलली जर्सी; नवी जर्सी पहाल तर फिदा व्हाल!