भाजपला दे धक्का! मनोहर पर्रिकरांच्या मुलाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पणजी | देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीस आता सुरूवात झाली आहे. प्रत्येक पक्ष आपापली उमेदवारांची लिस्ट जाहीर करत आहे. लिस्ट जाहीर होताच राजकारण पेटायला सुरूवात झाली आहे.

पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. परिणामी आता पक्षांतराला आणि बंडखोरीला सुरूवात झाली आहे.

पाचपैकी चार राज्यांमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. तर पंजाबमध्ये काॅंग्रेसची सत्ता आहे. पण चार राज्यात सत्ता राखण्याचं मोठं आव्हान आता भाजपपुढं असणार आहे.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांनी बंडखोरी केली आहे. परिणामी भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे.

मनोहर पर्रिकर हे देशाच्या राजकारणातील एक अजातशत्रू असं व्यक्तिमत्त्व होतं. मोदी सरकारमधील कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची ओळख देशाला होती. त्यांच्यानंतर आता गोव्यात भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे.

गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपुर्वीच उत्पल पर्रिकर यांना पणजी या मनोहर पर्रिकर यांच्या पारंपारिक जागेवर उमेदवारी मिळणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

आता उत्पल पर्रिकर हे पणजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढणार आहेत. गोव्यातील निवडणुकीत उत्पल यांच्या या निर्णयानं चुरस निर्माण झाली आहे.

भाजपनं उत्पल यांना पणजी या मतदारसंघाऐवजी बिचोली मतदारसंघातून लढण्याचा प्रस्ताव दिला होता. पण आपल्या वडीलांच्या पारंपारिक मतदारसंघातून आपण लढणार या मतावर उत्पल पर्रिकर ठाम राहिले आहेत.

गोव्याची विधानसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार आहे. महाविकास आघाडी, तृणमुल काॅंग्रेस, आप इत्यादी पक्ष देखील या निवडणुकीत उतरल्यानं भाजपची डोकेदुखी आधीच वाढलेली आहे.

दरम्यान, केवळ पक्षनेत्यांची मुलं आहेत म्हणून उमेदवारी देण्याची परंपरा भाजपमध्ये नाही, असं फडणवीस म्हणाले होते. परिणामि येत्या काळात त्यांचा हा निर्णय किती परिणामकारक ठरतो यावर गोव्याचं राजकारण अवलंबून असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 Sushant Singh Rajput: अभिनय सोडून सुशांत करणार होता हे काम, मोठी माहिती हाती

“शरद पवारांचा हा ढोंगीपणा, ज्या छगन भुजबळांना राष्ट्रवादीत घेतलं त्यांनीच…”

“मी कशाला त्यांची भेट घेऊ? आतापर्यंत कधीच शरद पवारांच्या…”

 नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! इंडिया गेटवर उभारणार सुभाष बाबूंचा भव्य पुतळा

 शरद पवार म्हणतात, “भाजपवाले कधीपासून गांधीवादी झाले…”