लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या मंत्रिमंडळाचा बुुधवारी विस्तार झाला. यावेळी एकूण 23 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी सर्व मंत्र्यांना शपथ दिली. आज शपथविधी झालेल्या 23 मंत्र्यांमध्ये 18 नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. तर पाच मंत्र्यांना बढती देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना जातीय आणि प्रादेशिक समतोल साधण्यासोबतच संबंधित मंत्र्यांची लोकसभा निवडणुकीतील कामगिरीही विचारात घेण्यात आली आहे.
आज शपथ ग्रहण करणाऱ्या मंत्र्यांमधील काही चेहरे हे पहिल्यांदाच आमदार झालेले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात सात चेहरे असे आहेत ज्यांना त्यांच्या कामगिरीची दखल घेत मंत्रिडळात बढती देण्यात आली आहे.
स्वतंत्र प्रभार असलेल्या पाच मंत्र्यांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले आहे. तर दोन राज्यमंत्र्यांना स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री बनवण्यात आले आहे. आज झालेल्या विस्तारानंतर उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या योगींना धरून 56 वर पोहोचली आहे.
योगींच्या मंत्रिमंडळातील नवे चेहरे
राम नरेश अग्निहोत्री, कमला राणी वरुण, कपिलदेव अग्रवाल, सतीश द्विवेदी, श्रीराम चौहान, नीलिमा कटियार, अशोक कटारिया, रवींद्र, जयसवाल, अनिल शर्मा, महेश गुप्ता, आनंदस्वरूप शुक्ला, विजय कश्यप, गिर्राज सिहं घर्मेश, लाखन सिंह राजपुत, चौधरी उदयभान सिंह, चंद्रिका प्रसाद उपाध्याय, रमाशंकर सिंह पटेल, अजित पाल.
कॅबनेट मंत्री
डॉ. महेंद्र सिंह – ग्रामविकास मंत्री
चौधरी भूपेंद्र सिंह पंचाती राज मंत्री
सुरेश राणा – उस विकास मंत्री
अनिल राजभर – समाज कल्याण आणि होमगार्ड मंत्री
उपेंद्र तिवारी – भूमी विकास मंत्री
रामनरेश अग्निहोत्री कमला राणी वरुण
राज्यमंत्री
अनिल शर्मा, महेश गुप्ता, आनंद स्वरूप शुक्ला, विजय कश्यप, डॉ. गिर्राज सिंह धर्मेश, लाखन सिंह राजपूत, नीलिमा कटिहार, चौधरी उदयभान सिंह, चंद्रिका प्रसाद उपाध्याय, रमाशंकर सिंह पटेल, अजित सिंह पाला
स्वतंत्र प्रभार मिळालेले मंत्री
नीलकंठ तिवारी, कपिलदेव अग्रवाल, सतीश द्विवेदी, अशोक कटारिया, श्रीराम चौहान, रवींद्र जयस्वाल.
23 MLAs take oath as ministers in Uttar Pradesh Government, 6 of them as Cabinet Ministers, in the first Cabinet reshuffle of the present Government pic.twitter.com/IaUqWyt7oc
— ANI UP (@ANINewsUP) August 21, 2019
महत्वाच्या बातम्या-
-राज ठाकरेंच्या ईडी नोटीशीवर उद्धव ठाकरे बोलले; म्हणतात…
-…म्हणून आदित्य ठाकरेंना पेंग्विन म्हणतात- धनंजय मुंडे
-अभिनंदन यांचा छळ करणाऱ्या पाकिस्तानी कमांडोचा खात्मा
-राष्ट्रवादीला मोठं खिंडार; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश???
-“महाराष्ट्र सैनिकांचा तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही”