Vaccine: पुण्यातील कंपनीने ‘चोरी’ करून लस बनवली?, तब्बल 7200 कोटींचा खटला दाखल

पुणे | अमेरिकन बायोफार्मास्युटिकल कंपनी एचडीटी बायो कॉर्पने वॉशिंग्टन येथील फेडरल न्यायालयात पुण्यात असलेल्या एमक्योरविरुद्ध 950 दशलक्ष डाॅलरचा म्हणजेच तब्बल 7200 कोटींचा खटला दाखल केला आहे.

दाखल करण्यात आलेल्या या खटल्यात भारतीय कंपनीवर नवीन कोविड लसीचे व्यापार रहस्य ‘चोरी’ केल्याचा आरोप आहे. एचडीटी बायोने यावर एक स्टेटमेंट देखील दिलं आहे.

पुण्यातील फर्मने एक नवीन लस तंत्रज्ञान चोरले आहे जे त्यांनी एमक्योरच्या उपकंपनी जेनोव्हाला भारतात उत्पादन आणि विक्रीसाठी परवाना दिला होता.

एम्क्योर विरुद्ध कोणताही खटला नाही आणि खटल्यात पक्षकार म्हणून चुकीच्या पद्धतीने समाविष्ट करण्यात येतंय. हे दावे रद्द करण्यासाठी कंपनी आवश्यक कायदेशीर पावले उचलत असल्याचं कंपनीच्या कायदेशीर तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

कराराच्या किंवा कायद्याच्या तरतुदींचे कोणतेही उल्लंघन नाही. अशा फालतू खटल्यांचा आम्ही जोरदारपणे बचाव करू, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणात आता काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

एसटी कर्मचाऱ्यांना धक्का! मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

“उद्धव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यात संबंध काय?”

Russia Ukraine War: नको तेच झालं! रशियाकडून युक्रेनवर ‘फॉस्फरस बॉम्ब’चा वापर, आता…

“मेहुणे, मेहुणे, मेहुण्यांचेsss पाहुणे”, व्हिडीओ शेअर करत मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

Mahua Moitra: “अटलजींची भीती आज खरी ठरली”, महुआ मोइत्रा लोकसभेत कडाडल्या