पुणे महाराष्ट्र

आघाडीची सत्ता येणार नाही… म्हणून भाजपमध्ये जातोय- वैभव पिचड

अहमदनगर | मी भाजपात प्रवेश करत असलो तरी पवारांचं ऋण कधीही विसरणार नाही. राज्यात आघाडीची सत्ता येणार नाही, म्हणून भाजपात जायोत. मतदारसंघातले प्रलंबित प्रश्न मार्गी लावायचे आहेत. तसे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे, असं राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचे सुपुत्र वैभव पिचड यांनी म्हटलं आहे.

आज अकोल्यात कार्यकर्ता मेळावा घेऊन वैभव पिचड यांनी आपल्या भाजप प्रवेशाची घोषणा केली. यावेळी वैभव पिचड बोलत होते.

हा निर्णय घेणे खूप कठीण होते. पण जनतेसाठी काळजावर दगड ठेऊन मला हा निर्णय घ्यावा लागला असल्याचं वैभव यांनी सांगितलं आहे. 

देश पातळीवर भाजप उत्तम काम करतंय. आपल्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला योग्य निर्णय घेणं गरजेचं असतं. काळानुसार बदलत वैभवने घेतलेला निर्णय योग्य आहे, असं म्हणत राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी आपले पुत्र वैभव पिचड यांच्या भाजप प्रवेशाला आपली सहमती दर्शवली आहे.

तालुक्याचा विकास महत्वाचा आहे. तो साधायचा असेल तर विकासाच्या दिशेने चालणाऱ्या पक्षाशी सहमत होणं गरजेचं आहे. भाजपला लोकांनी स्विकारलं आहे. त्यामुळे वैभवचा निर्णय योग्यच असल्याचं मधुकर पिचड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पिचड पिता पुत्रांचा भाजपप्रवेश राष्ट्रवादीला मोठा धक्का मानण्यात येतोय. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पिचड पवारांबरोबर होते.

महत्वाच्या बातम्या-

-प्रकाश आंबेडकरच आमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार!

-खडकवासला विधानसभा मतदारसंघात रुपाली चाकणकरांचा मार्ग मोकळा??

-“सुशिक्षित वाहनचालकांपेक्षा कमी शिकलेले वाहनचालक चांगलं वाहन चालवतात”

-…अखेेर NDRF च्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्र्यांनी केलं तोंडभरुन कौतुक

-“पेशवाईची गिधाडं झडप घालण्याच्या तयारीत; आपण वेळीच त्यांना रोखू”

IMPIMP