Valentine Day Special Amrit Udyan Open l यंदाचा व्हॅलेंटाईन डे साजरा करा अमृत उद्यानात; जाणून घ्या वेळ आणि तिकीट दर

Valentine Day Special Amrit Udyan Open l व्हॅलेंटाईन डे आठवडा सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. या दिवसांची कपल्स आतुरतेने वाट पाहत असतात. आता फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत आणखी एक सुंदर ठिकाण सुरू होत आहे. ते म्हणजे राष्ट्रपती भवनाचे अमृत उद्यान. जे पूर्वी मुघल गार्डन म्हणून ओळखले जात होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही अमृत उद्यानाचे दरवाजे लोकांसाठी खुले होत आहेत. तर आज आपण जाणून घेऊयात अमृत उद्यान कधी उघडणार आणि त्याची वेळ काय असणार. (Amrit Udyan)

अमृत ​​उद्यानाला मोफत देता येणार भेट :

सुंदर आणि रंगीबेरंगी फुले पहायची असतील तर अमृत उद्यानाला आवर्जून भेट द्यायला हवी. हे ठिकाण आजपासून म्हणजेच 2 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान लोकांसाठी खुले होणार आहे. व्हॅलेंटाईन डेला कपल्स येथे जाऊ शकतात. अमृत ​​उद्यान हे अतिशय सुंदर ठिकाण आहे जिथे विविध प्रकारची फुले पाहायला मिळतात. हे ठिकाण पाहण्यासाठी तुम्हाला कोणतेही प्रवेश शुल्क भरावे (Amrit Udyan Open) लागणार नाही. त्याची एंट्री राष्ट्रपती भवनाच्या गेट क्रमांक 35 मधून होणार आहे.

Valentine Day Special Amrit Udyan Open l अमृत ​​उद्यानाची वेळ काय असणार? :

अमृत ​​उद्यान हे अतिशय सुंदर ठिकाण आहे, जे पाहण्यासाठी तुम्हाला ठराविक वेळी येथे जावे लागते. अमृत ​​उद्यानात सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत प्रवेश असतो. मात्र आता या आठवड्यात तुम्ही संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच बागेला भेट देऊ शकता. सर्वात महत्वाचं म्हणजे सोमवारी येथे भेट देऊ नका, कारण हे उद्यान सोमवारी बंद असते.

अमृत ​​उद्यानाला भेट द्या आणि मनसोक्त आनंद लुटा (Amrit Udyan Open) :

जर तुम्ही या ठिकाणाला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सकाळी लवकर या अमृत उद्यानाला भेट देऊ शकता. कारण त्यावेळी तिथे गर्दी कमी असेल. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणाचा मनसोक्त आनंद घेता येईल. अमृत उद्यानात जाण्यासाठी तुम्ही बस, ऑटो किंवा कॅबने पोहोचू शकता. याशिवाय तुम्ही येथे मेट्रोनेही जाऊ शकता. सर्वात जवळचे मेट्रो स्टेशन केंद्रीय सचिवालय आहे, येथून विनामूल्य शटल सेवा उपलब्ध आहे.

News Title : Valentine Day Special Amrit Udyan Open

महत्वाच्या बातम्या – 

Poonam Pandey Death l सिनेसृष्टीतून खळबळजनक बातमी समोर! या प्रसिद्ध मॉडेलचे दुःखद निधन

Vodafone Idea 5G l Vi वापरकर्त्यांना मिळणार 5G सेवा; जाणून घ्या कधी होणार सुरु

Abhishek Bachchan Daughter l अभिषेक बच्चनने त्याच्या मुलीची जबाबदारी या व्यक्तीवर टाकली

Share Market l शेअर बाजारात मोठी वाढ! पाहा आजच मार्केट कस असेल

Today Horoscope l आजचे राशिभविष्य; या राशीचे व्यक्ती राजकीय क्षेत्रात आघाडी घेतील