दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो. सर्वच प्रेमीयुगलांसाठी हा एक प्रेमाचा अनोखा उत्सव आहे. तरुणाईमध्ये या दिवसाचं एक वेगळंच फ्याड आहे. अनेक वर्षांपासून प्रेमीयुगल हा डे साजरा करत आहेत. मात्र, व्हॅलेंटाईन डे मागे खरी कहाणी काय आहे? हा प्रश्न अनेकांना सतावत असतो. आज आम्ही तुम्हाला या स्पेशल दिवसमागची कहाणी सांगणार आहोत.
व्हॅलेंटाईन डे मागे अनेक दंतकथा आहेत. मात्र, व्हॅलेंटाईन डेची सर्वाधिक लोकप्रिय कथा रोमन किंग क्लोडियस आणि संत व्हॅलेंटाईन यांची आहे. बहुतेक लोक व्हॅलेंटाईन डे संत व्हॅलेंटाईनच्या नावाने साजरा केला जात असल्याचा मानतात.
काय आहे व्हॅलेंटाईन डे मागची कहाणी?
रोमन किंग क्लोडियसने आपल्या सैनिकांना लग्न करण्यास मनाई केली होती. परंतु संत व्हॅलेंटाईनने बहुतेक सैनिकांना लग्न करण्यास तयार केले आणि त्यांची लग्न लावून दीली. क्लोडियसला रा.ग अनावर झाल्याने त्याने संत व्हॅलेंटाईनला 14 फेब्रवारी रोजी फा.सावर चढवले.
व्हॅलेंटाईन डे कसा सुरू झाला?
व्हॅलेंटाईन डेची सुरुवात एका रोमन उत्सवापासून सुरू झाली आहे. काही काळापूर्वी रोममध्ये उन्हाळ्यात ‘Luparcalia’ नावाचा उत्सव साजरा केला जात होता. या उत्साहाच्या वेळी तरुण वर्ग खूप खुश असायचा.
Luparcalia उत्सवाच्या वेळी मुले एका बॉक्समधून मुलींची नावे काढत असत. यानंतर हे जोडपे ऊत्सवादरम्यान प्रियकर-प्रियसी बणून फिऱत असत. हे जोडपे केव्हा केव्हा लग्नबंधनात देखील बांधली जात असत. यानंतर काही काळाने तेथील सर्व ख्रिश्चन बांधव 14 फेब्रवारी हा दिवस संत व्हॅलेंटाईनच्या स्मरणार्थ आणि ऊत्सव म्हणून साजरा करू लागले.
व्हॅलेंटाईन डे नक्की कोणासाठी असतो?
व्हॅलेंटाईन डे हा प्रत्येकासाठी असतो. आनंदाचा आणि प्रेमाचा हा दिवस फक्त प्रेमीयुगलांसाठीच नव्हे तर आपल्या मनातील आपल्या कुटुंंबिंयांबद्दल आपल्या नातेवाईकांबद्दल आपल्या मित्रांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस असतो.
महत्वाच्या बातम्या –
‘सैराट’ मधील लंगड्या प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतोय ‘हा’नवीन चित्रपट
…..म्हणून सलमान खान सिनेमात अभिनेत्रीला किस करत नाही
ब्युटी ट्रिटमेंट करत असाल तर सावधान; तुमच्यासोबतही ‘हे’ घडू शकतं….
धक्कादायक! कोरोनाच्या नव्या लक्षणानं कापावी लागली हाताची बोटं
ऐकून व्हाल थक्क! ‘या’ चाॅकलेट बाॅक्सची किंमत आहे तब्बल 10 कोटी रुपये