वंचितची स्वबळावर लढण्याची तयारी; 30 जुलैला जाहीर करणार विधानसभेची पहिली यादी!

औरंगाबाद : आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील सर्व जागा लढण्यासाठी तयारी केली आहे. वंचितने स्वबळावर लढण्याची तयारी केली असल्याचं दिसतंय. 

वंचित बहुजन आघाडीकडून 30 जुलैपर्यंत विधानसभेची पहिली यादी जाहीर करण्यात येईल. पहिल्या यादीत विदर्भातील उमेदवारांचा समावेश असणार आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी दिली. 

काँग्रेसने जर 40 जागा दिल्या तर काँग्रेससोबत निवडणूक लढवू, असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं. विधानसभा निवडणूकीची पूर्वतयारी म्हणून वंचित बहुजन आघाडीने इच्छुकांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

13 जुलै ते 15 जुलैपर्यंत विदर्भातील सर्व मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर मराठवाड्यातील मतदारसंघासाठीही इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचं सांगितलं आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला दोन आकडी संख्येत जागा मिळतील, असा विश्वास प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला होता.

वंचित बहुजन आघाडीला काँग्रेससोबत घेणार असल्याच्याही चर्चा सुरु होत्या. एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनीदेखील वंचितकडे 100 जागांची मागणी केली होती. 

महत्वाच्या बातम्या-

-नवी मुंबईत ‘राष्ट्रवादी’ला खिंडार?; 13 नगरसेवक भाजपच्या वाटेवर???

-पराभवानंतर पार्थ मतदारसंघात फिरकलेच नाहीत; अजित पवार म्हणतात…

-आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला निकाल आणि झुकलं पाकिस्तान; घ्यावा लागला ‘हा’ निर्णय

-113 एनकाउंटर करणाऱ्या प्रदीप शर्मांचा राजकारणात प्रवेश???

-कर्नाटक सरकारचं भवितव्य आज ठरणार