नागपूर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

‘गाव तिथे बियर बार’; ‘या’ उमेदवाराचा आगळावेगळा प्रचार

चंद्रपूर : राज्यात विधानसभेच्या प्रचाराची धामधूम चालू आहे. सर्वच पक्ष निवडणुक जिंकण्यासाठी अनेक प्रकारच्या शकली लढवून प्रचार करत आहेत. प्रचारा दरम्यान चर्चेत राहण्यासाठी चंद्रपूर जिल्यातील चिमूर मतदारसंघातील वनिता राऊत या अपक्ष उमेदवाराने जिल्ह्यात दारूबंदी असताना, दारूला उघडपणे समर्थन दिले आहे. 

चिमूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार वनिता राऊत यांनी थेट जाहीरनामा प्रकाशित करत दारुला समर्थन दिलं आहे. गाव तिथे बियर बार अशी घोषणा देत प्रचाराचा बार उडवला. दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात वनिता राऊत यांनी ही घोषणा दिल्याने सध्या चंद्रपुरात सर्वत्र या घोषणेची चर्चा होत आहे. 

बेरोजगार तरुणांना दारु विक्रीचे परवाने, गाव तिथं बिअर बार, दारिद्र्य रेषेखालील लोकांना सवलतीत दारु, हे सर्व ऐकून कुणालाही धक्का बसेल. कारण, कुणालाही या धक्का बसावा अशाच या घोषणा आहेत.  

चिमूर मतदारसंघात काँग्रेसचे सतीश वारजूकर आणि भाजपचे किर्तीकुमार भांगडिया यांच्यात थेट लढत आहे. मात्र, आपल्या अनोख्या प्रचाराने वनिता राऊत यांनी स्वतःची वेगळी चर्चा सुरु करण्यात यश मिळवलं.

दरम्यान, आता चिमूरकर वनिता राऊत यांच्या जाहिरनाम्याचं किती मनावर घेतात हे आपल्याला येत्या 24 तारखेला कळेल.

 

महत्वाच्या बातम्या-