दहावी-बारावीच्या बोर्ड परिक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती, म्हणाल्या…

मुंबई | जवळपास गेल्या वर्षभरापासून कोरोना महामा.रीनं संपूर्ण जगात थै.मान घातलं आहे. चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेल्या या महामा.रीनं अक्षरश: सर्वांच्या नाकी नऊ आणलं आहे. या महामा.रीमुळे जगातील सर्व उद्योगधंदे, शाळा, कॉलेज सर्व काही कित्येक महिने बंद होतं.

मात्र, अलिकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्व स्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं ईतर गोष्टींबरोबर हळूहळू सर्व शाळा, कॉलेज चालू होऊ लागली होती. अशातच पुन्हा एकदा कोरोना वेगाने हातपाय पसरु लागला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नुकतंच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्थानिक स्तरावर आवश्यकता भासल्यास पुऩ्हा एकदा शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घोषित केला आहे. कोरोनामुळे दहावी बारावीच्या बोर्डच्या परिक्षा या कित्येक दिवसांपासून लांबल्या आहेत. लांबलेल्या दहावी बारावीच्या बोर्ड परिक्षांचं वेळापत्रक देखील नुकतंच जाहीर करण्यात आलं आहे.

लांबलेल्या दहावी बारावीच्या बोर्ड परिक्षां या नियोजित वेळापत्रकानुसारंच घेतल्या जातील, असं आज वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. तसेच वर्षा गायकवाड यांनी आज माध्यमांशी बोलताना माध्यमिक शिक्षणासंबंधीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

यावेळी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, बोर्डाची परिक्षा जाहीर केलेल्या तारखेनुसारच होईल. मुलांचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षितता हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. यासंबंधित खूप साऱ्या तज्ज्ञांशी शिक्षण विभाग बातचीत करत आहे.

तसेच गावखेड्यात पेपर पोहचवायला कमीत कमी दोन महिने लागतात. यामुळे आठवी नववीच्या परिक्षांबाबत आम्ही लवकरंच निर्णय घेऊ. बोर्डाच्या परीक्षेबाबत काही सूचना आणि मागण्या लोकांनी केल्या आहेत. मात्र, पेपर पॅटर्ननुसार मार्क्स असतात व पेपर त्यानुसारच तयार केले जातात. तरीही यात काही गोष्टीची आवश्यकता असेल तर तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊन निर्णय घेऊ, असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बारावीची बोर्डाची परिक्षा 23 मार्च ते 21 मे दरम्यान होणार आहे. तसेच दहावीची बोर्डाची परिक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार असल्याचं राज्य मंडळाकडून घोषित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांकडून 16 फेब्रुवारीला संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं.

महत्वाच्या बातम्या –

काय सांगता! 10 सेकंदाचा ‘हा’ व्हिडीओ तब्बल 48 करोडला विकला गेला; पाहा व्हिडीओ

कोव्हिड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

…..म्हणून ‘या’ महिलेनं शेअर केला टाॅयलेट मधला फोटो

निवडणुकीपूर्वी राज्यात खळबळ; ‘या’ नेत्यानं राजकारणाला ठोकला रामराम

पूजा चव्हाण प्रकरणात नवं वळण; ‘या’ कारणामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गु.न्हा दाखल