वरुण धवन ठाकरे सरकारवर संतापला, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

मुंबई | जवळपास गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातलं होतं. यामुळे सर्वकाही बंद करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात देखील कडक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं सर्वकाही खुलं करण्यात आलं आहे. परंतु कोरोनामुळे चित्रपट गृहांना लागलेली कुलुपे अद्याप उघडण्यात आली नाहीत.

महाराष्ट्रात सर्व काही सुरू झालं मात्र चित्रपटगृह अद्याप सुरू करण्यात न आल्यानं अनेक कलाकारांनी ठाकरे सरकारविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियाद्वारे अनेकांनी ठाकरे सरकारला चित्रपटगृह खुली करण्याची मागणी केली आहे.

अशातच आता अभिनेता वरून धवन याने देखील एक व्हिडिओ शेअर करत ठाकरे सरकारबद्दल संताप व्यक्त केला आहे. मुंबईतील वांद्रे येथील एक व्हिडिओ वरूनने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये वांद्रे परिसरात प्रचंड गर्दी जमलेली दिसत आहे. सर्व काही गोष्टी सुरू करण्यात आल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर कॅप्शन देत वरून धवनने सर्व काही सुरू मग चित्रपटगृह बंद का?, असा सवाल केला आहे. सोबत वरूनने नाराजीचा इमोजी देखील टाकला आहे.

वरूनच्या या इन्स्टाग्राम स्टोरीवरून त्याची ठाकरे सरकारवरील नाराजी स्पष्ट जाणवत आहे. काही राज्यांमध्ये चित्रपटगृह 50 टक्के क्षमतेनं सुरू करण्यात आली आहेत. परंतु महाराष्ट्रात चित्रपटगृह अद्याप बंदच आहेत. यामुळे अनेक कलाकार ठाकरे सरकरवर नाराज आहेत.

दरम्यान, बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी देखील याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. लॉकडाऊननंतर सर्व काही सुरू झालंय, विमानात देखील लोक एकमेकांशेजारी बसतात. मग चित्रपटगृह बंद का? असा सवाल त्यांनी केला होता.

संजय लीला भन्साळी यांचा ‘ गंगुबाई कोठेवाली’ हा चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, हा चित्रपट चित्रपटगृहातच रिलीज व्हावा, अशी भन्साळी यांची इच्छा आहे. यामुळे अद्याप हा चित्रपट रिलीज करण्यात आला नाही.

महत्वाच्या बातम्या-

मी खूपच रोमॅन्टिक आहे, मला 3-4 मुलांची तरी आई व्हायचंय – भूमी पेडणेकर

रणवीर आणि आलियाचा कीस करतानाचा ‘तो’ फोटो व्हायरल

नवरदेवाला पाहताच नवरी मंडप सोडून रस्त्यावर पळाली अन्…; पाहा व्हिडीओ

‘डिंपल लग्न करणार नाही तिला विक्रमच्या..’; शेरशाह विक्रम बत्रांच्या वडिलांचा खुलासा

“अर्जुनला इतकी मेहनत करताना पाहून वाटतं की सैफला सोडून त्याच्याशी लग्न करावं”