वरूण गांधींचा सरकारला घरचा आहेर, म्हणाले…

लखनऊ | देशात सध्या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत. देशातील सर्वाधिक आमदार असलेलं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशची सत्ता मिळवण्यासाठी सध्या सर्व पक्ष जोरदार प्रचार करत आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपनं 2017 ला स्पष्ट बहूमताच्या जोरावर सत्ता स्थापन केली होती. भाजपच्या चर्चित चेहऱ्यांपैकी एक असणारे योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत.

योगी आदित्यनाथ सरकारला समाजवादी पार्टी, काॅंग्रेस, आप, बसपा, यांच्या विरोधाचा सामना सध्या करावा लागत आहे. अशातच भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी भाजपच्या अडचणीत वाढ केली आहे.

शेतकरी आंदोलनापासून सातत्यानं वरूण गांधींनी भाजपविरोधी भूमिका घेतली आहे. भाजपच्या तिकीटावर पिलीभीत लोकसभा मतदारसंघातून गांधी 2019 ला लोकसभेत निवडून गेले आहेत.

वरूण गांधींनी शेतकरी आंदोलनाला पाठींबा दर्शवला होता त्यानंतर आता देशातून बॅंकेचे पैसे घेऊन पळून जाणाऱ्या उद्योगपतींच्या प्रश्नावर वरूण गांधींनी केंद्र सरकारला सल्ला दिला आहे.

वरूण गांधींनी बॅंकेचे पैसे कोणी किती बुडवले याची यादी ट्विटरवर पोस्ट केली आहे. देशात शेतकरी आत्महत्या करत असताना देशात इतके पैसे बुडवून जाणाऱ्यांचा तपास व्हायला हवा, असं वरूण गांधी म्हणाले आहेत.

विजय मल्ल्या 9000 कोटी, नीरव मोदी 14000 कोटी, ऋषी अग्रवाल 23000 कोटी, या उद्योगपतींनी भ्रष्टाचार केल्याचं गांधी म्हणाले आहेत. परिणामी सध्या वरूण गांधींच्या ट्विटची चर्चा सर्वत्र होत आहे.

आज देशात दररोज तब्बल 14 जण कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या करत असताना अशा सावकारी माणसांचे जीवन वैभवाच्या शिखरावर आहे. या महाभ्रष्ट व्यवस्थेवर सशक्त सरकारने सशक्त कारवाई करणे अपेक्षित आहे, असा टोला वरूण गांधी यांनी लगावला आहे.

दरम्यान, वरूण गांधींच्या टीकेनंतर भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेश भाजपच्या नेत्यांनी वरूण गांधींवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या – 

  ‘मुख्यमंत्री साहेब चुका होतात, फक्त जनतेला सांगा की…’; सोमय्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

  Kirit Somaiya: “किरीट सोमय्या म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी”

  येत्या दोन दिवसांत ‘या’ भागात अवकाळी पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा इशारा

  राज्यात पुन्हा बर्ड फ्लूचं सावट, ‘या’ ठिकाणी अनेक पक्षांचा मृत्यू

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर; मोदी सरकार लवकर ‘हा’ निर्णय घेणार