‘…हे त्यांनी एकदा जाहीर करावं’; वसंत मोरेंचं रूपाली पाटील ठोंबरेंना चॅलेंज

पुणे | पुण्यातील मनसेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला रामराम करत राजीनामा दिला आहे. यामुळे येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला पुण्यात मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

रूपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षातील अंतर्गत वादामुळे राजीनामा दिला असल्याचं बोललं जात होतं. अशात रूपाली पाटील ठोंबरेंनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलंय. पक्षातील काही रिकामटेकड्या नेत्यांमुळे पक्ष सोडण्याची वेळ आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

संदीप देशपांडे आणि वंसत मोरे आम्ही भावंड म्हणून काम केलं आहे. संदीप देशपांडे, वसंत मोरे काही बोलले असतील, त्यांना आता उत्तर देणार नाही, मात्र योग्य वेळ आल्यावर उत्तर देईन, असं म्हणत रूपाली ठोंबरे यांनी वसंत मोरे आणि संदीप देशपांडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

रूपाली ठोंबरे यांनी केलेल्या टीकेवर आता मनसे नेते वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी रूपाली ठोंबरेंच्या राजीनाम्यानं पक्षाला मोठं खिंडार पडणार नाही, असं वसंत मोरेंनी म्हटलं आहे.

पक्षातील रिकामटेकड्या नेत्यांकडून आपल्याला त्रास होतेय अशी टीका रुपाली पाटील- ठोंबरे यांनी केली होती, मात्र रिकामटेकडे कोण हे त्यांनी एकदा जाहीर करावं, असं आव्हानही वसंत मोरे यांनी केले आहे.

येत्या महापालिका निवडणुकात मनसेची ताकद दिसेल. पक्षांर्गत वादाचा विषय मी स्वतः राज ठाकरे आणि शर्मिला वहिनींसमोर विषय मिटवला होता, असंही वसंत मोरेंनी सांगितलं आहे.

रुपाली पाटील- ठोंबरे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर रुपाली पाटलांनी राजकीय आत्महत्या केली आहे, अशी बोचरी टीका वसंत मोरे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

रूपाली पाटील ठोंबरेंच्या राजीनाम्यानंतर वसंत मोरेंचं ट्विट, म्हणाले…

मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला झटका 

“वसंत मोरे, संदीप देशपांडे यांच्यासोबत भावंड म्हणून काम केलं, पण…” 

…म्हणून रूपाली पाटील ठोंबरेंनी दिला राजीनामा; खरं कारण आलं समोर 

तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होणार; पुणे म्हाडाने केली ही मोठी घोषणा