“…म्हणून मी माझ्या प्रभागात हनुमान चालीसाचे भोंगे लावणार नाही”

पुणे | गुढीपाडव्या दिवशी मनसेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईत पार पडला, यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवर मोठ्या आवाजात भोंगे लावले तर आपण त्यापेक्षा मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावू, असं वक्तव्य केलं होतं.

या वक्तव्यामुळे राज ठाकरेंवर अनेक स्तरातून टीका झाली, सोशल मीडियावर देखील सर्वसामान्य नागरिकांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केलीये.

राज ठाकरेंनी मनसे सैनिकांना मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याचं आवाहन केलं होतं, तरी देखील पुण्याचे मनसे शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी हनुमान चालीसा लावण्यास नकार दिला आहे.

मी माझ्या प्रभागात शांतता कशी राहील याचा प्रयत्न करणार. कोणीही वेगळा प्रयत्न करणार नाही. मात्र मलाच कळेना झाले आहे, मी काय भूमिका घ्यावी अशा शब्दात वसंत मोरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी माझं बोलणं झालेलं नाही. त्यांनी बोलावलं तर मी माझी भूमिका त्यांना समजावून सांगेल. कारण मला माझा प्रभाग नाही तर शहर शांत ठेवायचं आहे, असंही ते म्हणाले.

राज ठाकरे यांच्या भाषणानंतर किती जणांनी शहरात स्पिकर लावले? जे बोलतायेत त्यांनी आत्मपरीक्षण करावं, वसंत मोरेला पक्ष भूमिकेबद्दल शिकवू नये, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“…यांना सिंहासनावरून खाली खेचल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही” 

मोठी बातमी! कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय 

‘या’ 6 जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज 

मोठी बातमी! संजय राऊतांचा सोमय्यांवर अत्यंत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ 

लेकीच्या जन्माचा आनंद गगनात मावेना; स्वगतासाठी बापाने हेलिकॉप्टर मागवला