मोठी बातमी ! वसंत मोरेंना मनसे पुणे शहरप्रमुख पदावरुन हटवलं

पुणे | वसंत मोरे यांना मनसे पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवल्याचं कळतंय. नगरसेवक साईनाथ बाबर यांची पुणे शहर प्रमुखपदी वर्णी लागली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसेच्या पुणे पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु आहे. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशानंतर शहराध्यक्ष असलेले वसंत मोरे यांनी मशीदीवरील भोंग्याबाबत मात्र वेगळी भूमिका घेतली. मी माझ्या प्रभागात अशाप्रकारचे स्पीकर लावणार नाही, ही ठाम आणि सर्वसमावेशक भूमिका त्यांनी घेतली. त्यांच्या भूमिकेचे एकीकडे स्वागत होत असले तरी पक्षांतर्गत मात्र विरोध होताना दिसत आहे.

वसंत मोरेंच्या भूमिकेनंतर आता वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादीत जाण्यासाठी वसंत मोरे तयारी करत असल्याची कुजबूज सुरू झाली आहे.

मी पक्षाची नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका मांडली आहे. मी पक्षाच्या स्थापनेपासून मनसेत आहे. राज ठाकरे यांच्याशी बोलण झाल नाही. त्यांनी बोलावलं तर भूमिका त्यांना समजावून सांगेल. कारण मला माझा प्रभाग नाही तर शहर शांत ठेवायचं आहे, असंही ते म्हणाले होते.

तर त्यामुळे आलेल्यांनी मला सांगू नये, राज ठाकरे यांच्या भाषणानंतर किती जणांनी शहरात स्पिकर लावले? जे बोलतायेत त्यांनी आत्मपरीक्षण करावं, अशी टीका त्यांनी पक्षाच्याच सहकाऱ्यांवर विशेषत: प्रदेश सरचिटणीस असलेले हेमंत संभूस यांच्यावर केली.

महत्त्वाच्या बातम्या-  

“तुम्ही काय Xपटलं, तुम्ही काय कापलं सांगा?” 

“सोमय्यांची वकिली करण्यापेक्षा फडणवीसांनी त्यांना चार जोडे हाणावेत” 

“देशाच्या स्वातंत्र्यांचा नवा लढा सुरू, आम्ही बलिदान द्यायला तयार”