पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडवा मेळाव्यात हिंदूत्वाची भूमिका मांडली होती. त्यानंतर आता मनसेमध्ये नाराजीचं वातावरण आहे. अनेक नेते राज ठाकरे यांच्या निर्णयाला विरोध करताना दिसत आहे.
राज ठाकरे यांच्या सभेनंतर अनेक मनसेच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी राजीनामे देखील दिले आहेत. अशातच मनसेचे पुण्यातील धडाकीचे नेते वसंत मोरे यांना मनसे पुणे जिल्हा शहराध्यक्ष पदावरून हटवलं आहे.
राज ठाकरे यांच्या भूमिकेला विसंगत भूमिका वसंत मोरे यांनी मांडली होती. त्यानंतर राज ठाकरे आणि वसंत मोरे यांची चर्चा देखील झाली. त्यानंतर राज ठाकरे यांनी निर्णायक भूमिका घेतली आहे.
वसंत मोरेनंतर मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुण्याच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही या नियुक्तीची माहिती देण्यात आली.
साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आल्यावर आता वसंत मोरे यांनी साईनाथ बाबर यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. वसंत मोरे यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे.
“अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे ” कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड! खूप खूप अभिनंदन साई!, असं ट्विट वसंत मोरे यांनी केलं आहे.
दरम्यान, वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी अनेकदा पुण्यात मोठमोठी आंदोलनं केली आहेत. त्यामुळे आता साईनाथ बाबर वसंत मोरेंच्या ट्विटला काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी ! वसंत मोरेंना मनसे पुणे शहरप्रमुख पदावरुन हटवलं
“तुम्ही काय Xपटलं, तुम्ही काय कापलं सांगा?”
“सोमय्यांची वकिली करण्यापेक्षा फडणवीसांनी त्यांना चार जोडे हाणावेत”
“देशाच्या स्वातंत्र्यांचा नवा लढा सुरू, आम्ही बलिदान द्यायला तयार”