वंचितला झटका; शरद पवारांच्या उपस्थितीत 500 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई | अकोल्यानंतर मुंबईतही वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मुंईतील वंचित बहुजन आघाडीचे सर्व जिल्हाध्यक्ष पदाधिकारी यांच्यासह एकूण 500 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

वंचित बहुजन आघाडीते इशान्य मुंबईतील जिल्हाध्यक्ष राहुल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्ष पदाधिकारी अशा एकूण 500 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विक्रोळी पश्चिमेकडील कैलास कॉम्प्लेक्स सभागृहात झालेल्या कार्यक्रमात या कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. यामुळे वंचित बहुत आघाडीला मोठा फटका बसणार आहे.

दरम्यान, याआधी वंचितच्या अकोला जिल्ह्यातील दोन माजी आमदारांसह राज्यभरातील 48 पदाधिकाऱ्यांनी शनिवारी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-नाव शेतकऱ्यांचं, पैसा जनतेचा आणि तुंबड्या भरल्या कंत्राटदारांच्या; जलयुक्त शिवारवर काँग्रेसची टीका

-भीमा कोरेगावप्रकरणात शरद पवार यांची साक्ष होणार

-फक्त सरपंचच नाही तर मुख्यमंत्रीदेखील जनतेतून पाहिजे; अण्णा हजारेंची मागणी

-‘कर्ज फिटलं साहेब, पोरीच्या लग्नाला या’; अजितदादांचा आपुलकीचा प्रश्न… कुठं दिलं लेकीला?

-अजित पवार यांच्याकडे आणखी एक महत्त्वाची जबाबदारी