‘…अन् शिवच्या राणीने घेतली शिवच्या जिजाऊंची भेट!’

पुणे |  बिग बॉस मराठीमधलं लव्हबर्ड्स शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांच्या गोड मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं आणि मग दोघांनीही नात्याची कबुली दिली. आणि आता यंदा कर्तव्य आहे की काय?? असा प्रश्न चाहत्यांना पडलेला असतानाच शिवच्या वाढदिवसाचं निमित्त साधून शिव वीणाला घेऊन थेट आपल्या अमरावतीच्या घरी पोहचला आहे.

आपल्या राणीची भेट जिजाऊंसोबत, असं कॅप्शन देऊन शिवने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटसचा अक्षरश: पाऊस पाडला आहे.

शिवच्या वाढदिवसाचं निमित्त साधून आपल्या हातावर वीणाने शिवच्या नावाचा टॅटू काढून त्याला बर्थडे गिफ्ट करत सरप्राईज दिलं. हा टॅटt देखील प्रेक्षकाच्या पसंतीस उतरलेला आहे.

आम्ही बिसबॉसच्या घरात जे काही वागलो ते आम्ही ठरवून वागलो नाही. आमचा स्वभाव जुळत गेला आणि आमची घट्ट मैत्री झाली. आता आमचं चांगलं ट्युनिंग झालंय. त्यामुळे आम्ही हे नातं आता यापुढेही निभावणार आहोत, असं शिव-वीणा या जोडीने याआधीच सांगितलंय.

लग्न आम्ही कुठे करणार हे आम्हाला माहिती नाही किंवा आम्ही ते आणखी ठरवलंही नाही. मात्र उल्हासनगर आणि अमरावती या दोन्हीही ठिकाणी आम्ही रिसेप्शन ठेऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, शीव आणि वीणाचे त्यांच्यात असलेल्या मैत्रीने आणि प्रेमाने हजारो चाहते झाले आहेत. बिग बॉस शो संपल्यानंतरही हे दोघं कायम एकमेकांच्या सोबत असून प्रत्येक अपडेट सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना देत आहेत.

 

View this post on Instagram

 

⭐️Finally…. ❤️Rani meet aapli jijau????⛳️ @veenie.j @colorsmarathiofficial @endemolshineind

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9) on

महत्वाच्या बातम्या-