‘अति हुशार त्याचा बैल रिकामा’; पाहा तरूणाचा मजेशीर व्हिडीओ

नवी दिल्ली | आजकाल सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक आणि भितीदायक असतात.

परंतू त्यातील काही व्हिडीओ खूपच मजेशीर आणि हस्यास्पदही असतात. आपल्याला माहित आहे की, माणूस हा पृथ्वीतलावरील सर्वांत हुशार आणि बुद्धिमान प्राणी समजला जातो. त्यामुळे माणसाने सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे.

त्यामुळे या माणसाने आधुनिक केलेल्या जगात तो खूपच हुशार असल्यासारख त्याला वाटतं आहे. प्रत्येक माणूस स्वत:च सगळ्याचा मालक असल्यासारखा वावरत असतो. एवढंच नाहीतर निर्सगापुढेही तो स्वत:लाच खूप मोठा समजतो आहे.

त्याचप्रमाणे नाही त्याठिकाणी नको असलेल्या डोकंही वापरत असतो. कि ज्या ठिकाणी त्याची गरजही नसते. अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पाण्यातून रस्ता ओलांडत आहे. हे करत असताना त्यानं हुशारपणाची हद्दच पार केली असल्याचं दिसून येतं आहे. एका ठिकाणी रोडवर पावसामुळे पाणी साठलं असल्यामुळे एक व्यक्ती त्यापाण्यामध्ये विटा ठेवत-ठेवत पुढे चालत आहे.

त्याच्या हातात एक विट असून, तो ती विट पहिली पाण्यामध्ये ठेवत आहे, त्यानंतर दोन्ही पाय त्याच्यावर देत आहे. परत पुढे जाण्यासाठी आपले दोन्ही पाय खाली टेकवत पाण्यात उभा राहून, पुन्हा ती विट थोड्या अंतरावर पुढे ठेवत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर खूप मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओला बऱ्याच जणांनी लाईकही केलं असल्याचं समजतं आहे.

https://www.instagram.com/p/CUb2PiqjR9v/

महत्वाच्या बातम्या-

लग्नात नवरीसमोर नवरदेवानं असं काही केलं की सगळे पाहतच राहिले, पाहा व्हायरल व्हिडीओ

काय सांगता! चक्क एका बैलाने केला जबरदस्त स्टंट, पाहा व्हिडीओ

‘रॉकिंग आई’ आईशी पंगा घेणं मुलाला पडलं महागात, पाहा व्हायरल व्हिडीओ

लग्नात नवरा सोडून नवरीने दीरांसोबतच केला भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

धक्कादायक! स्पर्धा जिंकण्यासाठी तरूणाने केला जीघेणा प्रयत्न, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ