मुंबई | राज्यात भोंग्यावरून राजकारण तापलं असताना रमजान आणि अक्षय तृतीया सणात कुठली बाधा येऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे.
मुंबईत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून एसआरपीएफ, क्यूआरटी यांची अतिरिक्त कुमक शहरात ठिकठिकाणी तैनात ठेवण्यात आली आहे.
औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाषणाचा अभ्यास केला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी औरंगाबाद पोलीस सक्षम आहेत, असं राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी म्हटलंय.
राज ठाकरे यांच्यावर जी कारवाई करायची असेल त्यासंदर्भात औरंगाबाद पोलिसांकडून पाऊले उचलली जातील, असं रजनीश सेठ यांनी स्पष्ट केलंय.
राज्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी SRPF च्या 87 कंपनी आणि होमगार्डचे 30 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत, असं त्यांनी सांगितलं.
राज ठाकरे यांनी ईदपर्यंत मशिदींवरील भोंगे न उतरल्यास हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! राणा दाम्पत्याला आणखी एक झटका, ‘त्या’ नोटीसने टेंशन वाढलं
सर्वात मोठी बातमी! राज ठाकरे यांना अटक होणार?, महत्त्वाची माहिती समोर
काँग्रेसला सर्वात मोठा झटका, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर
भोंगा प्रकरणी मुंबई पोलिसांची सर्वात मोठी कारवाई!
“देवेंद्र फडणवीस मिस्टर इंडिया बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा मारत होते का?”