बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!

नवी दिल्ली | तुम्ही जर बँक ऑफ बडोदाचे (Bank Of Badoda) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना ही सुविधा देतं की ते एटीएम/डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढू शकतात.

जर तुम्हाला एटीएम कार्ड नेण्यात अडचण येत असेल किंवा तुम्ही तुमचे एटीएम कार्ड घरी विसरला असाल तर तुम्ही एटीएममधून सहज पैसे काढू शकता.

बँक ऑफ बडोदाने या सुविधेला कॅश ऑन मोबाईल असं नाव दिलं आहे. यासाठी तुमच्या फोनमध्ये बँक ऑफ बडोदाचे एम-कनेक्ट प्लस अॅप असणं आवश्यक आहे. या अॅपद्वारे तुम्ही देशातील बँक ऑफ बडोदाच्या एटीएममधून पैसे काढू शकता.

बडोदाच्या ग्राहकांना फक्त BOB M-Connect Plus अॅप उघडणे आणि कार्डलेस व्यवहारासाठी OTP जनरेट करणं आवश्यक आहे. सर्वप्रथम एम-कनेक्ट प्लस अॅपवर लॉगिन करा आणि प्रीमियम सर्व्हिसेस टॅबवर टॅप करा. Cash on Mobile Service वर क्लिक करा.  आता तुमचा खाते क्रमांक निवडा, रक्कम टाका आणि सबमिट करा.

आता तुम्हाला या ओटीपीसह तुमच्या जवळच्या बँक ऑफ बडोदाच्या एटीएमवर जावं लागेल आणि एटीएम स्क्रीनवर कॅश ऑन मोबाइल पर्याय निवडावा लागेल. आता तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP टाका आणि रक्कम टाका.

महत्त्वाच्या बातम्या- 

“तुमची झोप उडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुरेसे आहेत” 

“106 काय 130 असूद्या पण अनाजी पंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही” 

देवेंद्र फडणवीसांचं एकच वक्तव्य, संजय राऊतांच्या दुखऱ्या जखमेवर ठेवलं बोट 

…तर संजय राऊतांचा पराभव झाला असता; या पोस्टनं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ