पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; महापालिकेनं केलं ‘हे’ आवाहन

पुणे | राष्ट्रपती रामनाथ कोविंद दौऱ्यावर असल्याने गेल्या गुरुवारी पुण्याचा बंद होणारा पाणीपुरवठा सुरळीत ठेवला होता. मात्र या गुरुवारी तो पुन्हा बंद ठेवणार असल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आलीये.

पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर पंपिंग येथे येत्या गुरुवारी विद्युत आणि स्थापत्यविषयक देखभाल दुरुस्तीची काही कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रोड, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रोड ते एसएनडीटी, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डडाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन, मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरीनगर, साईबाबा नगर, सर्वेक्षण क्रमांक 42 आणि 46, कोंढवा खुर्द, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

केकेच्या मृत्यूचं गुढ वाढलं; चेहऱ्यावर, डोक्यावर जखमेच्या खुणा 

पुतिन यांच्या मृत्यूच्या अफवेवर रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला मोठा खुलासा! 

केकेचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, मृत्यूच्या काही तास आधीच… 

LPG ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी झाला स्वस्त  

मोठी बातमी! राज ठाकरेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण