मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीसाठी धक्का देणारी घटना घडली आहे. आपल्या अभिनयान प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते रमेश देव यांच ह्रदयविकारामुळं निधन झालं आहे.
अनेक मराठी आणि इतर चित्रपटांमध्ये काम केलेले आणि अभिनयानं जिवंतपणा आणणारे अभिनेते म्हणून रमेश देव यांना ओळखण्यात येतं. त्यांच्या निधनानं सिनेक्षेत्राला मोठा फटका बसला आहे.
रमेश देव यांचे पुत्र आणि आघाडीचे मराठी अभिनेते अजिंक्य देव यांनी याबाबत माहिती दिली आहे. रमेश देव यांचं वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वीच म्हणजेच 30 जानेवारीला त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.
रमेश देव यांना एक अत्यंत चांगला अभिनेता म्हणून ओळखण्यात येतं. त्यांच्या जाण्यानं सिनेक्षेत्राची चांगली जाण असणारा अभिनेता गेला आहे. त्यांच्या निधनावर विविध स्तरातून शोक व्यक्त होत आहे.
रमेश देव हे मुळचे राजस्थानचे होते. छत्रपती शाहू महाराजांमुळं त्यांचं आडनाव देव झालं होतं. रमेश देव यांच्या वडीलांनी शाहू महाराजांची मदत केली होती. त्यानंतर शाहू महाराज त्यांना देव म्हणत होते.
हिंदी आणि मराठी सिनेक्षेत्रात देव यांनी भरीव योगदान दिलं आहे. देव यांनी तब्बल 180 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. देव यांनी टेलिव्हीजन मालिका आणि जाहिरातींमध्ये देखील काम केलं आहे.
दरम्यान, देव यांच्या निधनावर चित्रपट क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. रमेश देव यांनी 1951 मध्ये चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ना चौकार ना षटकार, अखेरच्या चेंडूवर 5 धावांची गरज असताना पठ्ठ्यांनी मॅच जिंकली; पाहा व्हिडीओ
BIG BREAKING: नितेश राणेंना कोर्टाचा दणका, पुढील दोन दिवस पोलीस कोठडीत मुक्काम
IPL 2022: मुंबई इंडियन्सचा ‘हा’ स्टार खेळाडू आरसीबीच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता
रिपोर्टिंंग करणाऱ्या महिलेसमोर चाचानं केलं असं काही की…; पाहा व्हायरल व्हिडीओ
एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा झटका, ‘वयाच्या सतराव्या वर्षी…’