नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट मंडळ (BCCI) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ (Rich Cricket Board In World) आहे. भारतीय संघाच्या व्यवस्थापनावर बोर्डाकडून प्रचंड पैसा खर्च करण्यात येतो. काही दिवसांपूर्वी झालेल्या विश्वचषकात (T20 World Cup) भारतीय संघाचा मेन्टाॅर (Team Mentoar) म्हणून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) पाठवण्यात आलं होतं. यावरून आता माजी दिग्गज क्रिकेटपटूनं खुलासा केला आहे.
भारतीय संघाला आपल्या नेतृत्वाखाली दोन विश्वचषक जिंकून देणारा यशस्वी कर्णधार म्हणून धोनीला ओळखण्यात येत. पण त्याच्या मेन्टाॅरशीपचा फायदा भारतीय संघाला झाला नाही. भारतीय संघ साखळी फेरीतूनच बाहेर पडला.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री या जोडीची ही एकत्रित शेवटची स्पर्धा ठरली. या स्पर्धेनंतर कोहलीनं भारतीय टन्वेंटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.
भारतीय संघात सर्वकाही आलबेल राहावं यासाठी धोनीला मेन्टाॅर म्हणून पाठवण्यात आलं होतं, असं वक्तव्य भारताचा माजी खेळाडू अतुल वासन यांनी केलं आहे. इतकच नाहीतर वासन यांनी धोनीला भारतीय संघासोबत पाठवण्यामागचं आणखीन एक कारण सांगितलं आहे.
विराट कोहली आणि रवी शास्त्री हे आपल्याला हवी तशी निवड करत होते, म्हणून संघात संतुलन राखण्यासाठी धोनीची निवड करण्यात आल्याचा गौप्यस्फोट वासन यांनी केला आहे. परिणामी वासन यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ माजली आहे.
बीसीसीआयला वाटत होत की, विराट कोहली आणि रवि शास्त्री भारतीय संघाला नियंत्रित करत आहेत, परिणामी त्यांनी धोनीला पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी विश्वचषकात बराच गोंधळ घातला, असं वक्तव्यही वासन यांनी केलं आहे.
भारतीय क्रिकेटमधील शास्त्री-कोहली जोडीनं बराच काळ गाजवला आहे. विराट कोहली हा आक्रमक स्वभावासाठी सर्वत्र ओळखला जातो. परिणामी त्याची आणि शास्त्रींची जोडी चांगली जमायची. पण आता ही जोडी फुटली आहे.
शास्त्रींच्या राजीनाम्यासोबतच विराटला आपल्या कर्णधारपदालादेखील मुकावं लागलं आहे. बीसीसीआयकडून विराटकडं असलेलं वनडे संघाचं कर्णधारपद काही दिवसांपूर्वीच काढून घेण्यात आलं आहे.
सध्या विराट कोहली केवळ कसोटी संघाच्या कर्णधारपदी कायम आहे. अशा परिस्थितीत आता वासन यांच्या या वक्तव्यांनं बीसीसीआयमधील गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आणला आहे.
दरम्यान, विराट कोहली आणि बीसीसीआयच्या वादाला विश्वचषकापासूनच सुरूवात झाल्याची चर्चा आहे. अशात आता वासन यांनी बीसीसीआयला धारेवर धरलं आहे.
महत्वाच्या बातम्या
रामदास कदमांचं पुन्हा बंड! अधिवेशनात ठाकरे सरकारला दिला थेट इशारा
“लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…”
‘मांजर आडवं गेलं तर थांबू नये’; शिवसेनेचा नितेश राणेंवर हल्लाबोल
1 व्यक्ती 4 डोस; Omicronला रोखण्यासाठी देश सज्ज
फक्त बूस्टर डोस घेऊन फायदा नाही, Omicron ला रोखायचं असेल तर…