मोठी बातमी! ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

मुंबई | मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते आणि विनोदाचे बादशहा प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांचे आज (दि. 09) रोजी गिरगाव येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. हृद्यविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

नाटक, मालिका आणि चित्रपट या सर्वच क्षेत्रांत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. त्यांच्या विनोदी भूमिकांमुळे ते जनमाणसांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते.

त्यांच्या कारकर्दीची सुरुवात दूरदर्शन वाहिनीवर वृत्त निवेदक म्हणून केली होती. त्यानंतर नाटक, मालिका आणि चित्रपट असा त्यांचा प्रवास झाला. आचार्य अत्रे लिखीत मोरुची मावशी त्यांचे गाजलेले नाटक.

या नाटकात त्यांनी प्रशांत दामले आणि विजय चव्हाण यांच्यासोबत अभिनयाची धमाल उडवून दिली होती. त्यांचे मराठीतील अनेक चित्रपट आणि त्यांच्या भूमिका गाजल्या.

एर फूल चार हाफ, डान्स पार्टी, गोळा बेरीज, पोलीस लाईन आणि चष्मे बहाद्दर इत्यादी चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट जगताचे मोठे नुकसान झाले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

पीव्ही सिंधूने रचला इतिहास; भारतासाठी गोल्ड मेडल जिंकलं

टीईटी घोटाळा प्रकरणी धक्कादायक माहिती आली समोर!

मंत्रिमंडळ विस्ताराचं अखेर ठरलं, वाचा कुणाला संधी मिळणार

“उद्धव ठाकरेंनी सोबत यावं, म्हणून आता त्यांच्या दारात जाणार नाही”

उद्या मंत्रिमंडळ विस्तार, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया