कोरोना नियमांचं उल्लंघन करणं पडलं महागात, ‘या’ अभिनेत्रीवर झाला गुन्हा दाखल

मुंबई| दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक कलाकार देखील या कोरोनाच्या विळख्यात सापडलेले पहायला मिळत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान हिनं कोरोनाचे नियम मोडले असून तिच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेनं तक्रार दाखल केली आहे.

अभिनेत्री गौहर खानला करोनाची लागण झाली आहे आणि तिला क्वारंटाईन करण्यात आलं आहे. मात्र, गौहर खान शूटिंगसाठी गेली असल्याचं समोर आलं आहे. ओशिवरा पोलिसांच्या माहितीनुसार, गौहरचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे तिला क्वारंटाईन करण्यात आलं होतं.

महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, अंधेरीतल्या तिच्या घरी जेव्हा ते गेले त्यावेळी तिथे कोणी दार उघडलं नाही. आणि त्यानंतर हे कळालं की ती बाहेर शूटिंगसाठी गेली आहे. आणि त्यानंतर त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्याकडे धाव घेतली.

सुरक्षितेसाठी महानगरपालिकेनं तिच्याविरोधात अधिकृत तक्रार नोंदवली आहे. याबाबत त्यांनी एका ट्विटद्वारे माहिती दिली. “शहराच्या सुरक्षितेसाठी आम्ही कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही. एका बॉलिवूड अभिनेत्रीनं कोरोनाच्या निर्देशांचं पालन केलं नाही. त्यामुळं आम्ही तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तुम्ही सेलिब्रिटी असाल किंवा सर्वसामान्य नागरिक नियम हे सर्वांसाठी समान असतात. त्यामुळं विषाणूचा नाईनाट करण्यासाठी कृपया प्रशासनाला सहकार्य करा.” अशा आशयाचं ट्विट बीेएमसीनं केलं आहे.

ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडसंहितेच्या साथरोग नियंत्रण कायद्याअंतर्गत कलम 188, 269, 270, 51ब अन्वये तिच्यावर गुन्हा दाखल केला असल्याचं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं.

दरम्यान, अलीकडेच अभिनेत्री गौहर खान हिच्यावर आज दु:खाचा डोंगर कोसळला. दीर्घकाळापासून आजारी असलेलय तिच्या वडिलांचे मार्च महिन्यात निधन झाले.जफर अहमद खान असं गौहर खानच्या वडिलांचे नाव आहे. गेल्या गौहरचे वडील अनेक दिवसांपासून रूग्णालयात भरती होते.

 

महत्वाच्या बातम्या –

ठाण्यात मेन रोडवर कार झाडाला धडकून जागेवर पलटली अन् मग…; पाहा व्हिडीओ

कचरा गोळा करणाऱ्या भावांना मिळाली ‘या’ शोमध्ये गाण्याची संधी, लोकांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव, पाहा व्हिडीओ

राज्यातील लॉकडाऊन संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

ताजमहालचं नाव आता राम महल होणार? भाजप नेत्याचा मोठा दावा

जाणून घ्या! हळदी दूध पिण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे