विराटचा डबल धमाका; ‘या’ दिग्गजांना मागे टाकत ठरला पहिला भारतीय खेळाडू

पुणे : भारत वि. दक्षिण आफ्रिका सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने आपल्या कारकीर्दीतील सातवे दुहेरी शतक ठोकले. कसोटी क्रिकेटमध्ये सात द्विशतक करणारा भारतीय खेळाडू  ठरला आहे. 299 चेंडूत कोहलीने आपल द्विशतक पुर्ण केलं.

विराटनं आपल्या शतकाच्या बळावर कमी डावात 26 कसोटी शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथा क्रमांक पटकावला. या यादीत ऑस्ट्रेलियाचे सर डॉन ब्रॅडमन 69 अव्वल, स्टीव्ह स्मिथ 121 आणि सचिन तेंडुलकर 136 तिसऱ्या क्रमांकावर आहे.

विराट फक्त डॉन ब्रॅडमन यांच्या मागे आहे. त्याचबरोबर स्टिव्ह स्मिथ, माजी विंडीज फलंदाज गॅरी सोबर्स यांच्याशीही बरोबरी साधली. या दोघांच्या नावावरही कसोटी क्रिकेटमध्ये 26 शतकांची नोंद आहे.

या खेळीदरम्यान विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 6 हजार 900 धावांचा टप्पा ओलांडत माजी फलंदाज दिलीप वेंगसरकर यांना मागे टाकले. 

दरम्यान, भारताच्या शेवटचे वृत्त हाची आले असताना भारताने 600 धावांमध्ये 4 फलंदाज गमवले होते. मैदानावर विराट कोहली 253 धावांवर खेळत आहे, तर त्याच्या साथीला रविंद्र जडेजा 91 धावांवर खेळत आहे. 

 

 

महत्वाच्या बातम्या-