Video: ‘ऊ अंटावा’नंतर समांथाचा आणखी एक डान्स व्हायरल; विमानतळावर नक्की काय झालं?

मुंबई | अभिनेत्री समांथा रूथ प्रभू ही अतिशय लोकप्रिय असून सध्या चांगलीच चर्चेत असलेली पहायला मिळत आहे. तिने तेलगू आणि तमिळ चित्रपटांत भरपूर नाव कमावलं आहे.

समांथा रूथ प्रभू ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. अनेक फोटो आणि व्हिडीओ समंथा वेळोवेळी पोस्ट करत असते.

समांथानी सोशल मीडियावर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये ती चक्क मध्यरात्री विमानतळावर डान्स करताना दिसत आहे.

डान्स करतानाचा हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘आणखी एक रात्री उशिराची फ्लाइट…’ या आशयाचे कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे तिचा संताप एक वेगळ्या माध्यमातून तिने व्यक्त केलाय.

सुपरस्टार अभिनेत्री समांथा ही सुरूवातीला तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती. तिने ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटात पहिल्यांदाच ‘ऊ अंटावा’ हे आयटम साँग केलं आणि आता समांथाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

समांथानं डान्समध्ये काळ्या रंगाची जिन्स, व्हाइट शूज आणि डेनिम जॅकेट घातलं आहे. समांथाचा डान्स चाहत्यांना चांगलाच आवडल्याचं दिसत आहे.

दरम्यान, चाहत्यांनी समांथाच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्यामुळे आता मनोरंजन क्षेत्रात फक्त समंथाचीच चर्चा असल्याचं दिसतंय.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)


महत्त्वाच्या बातम्या – 

“बाबा परत असं घोड्यावर बसायचं नाही”; अमोल कोल्हेंचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

  “…हिशोब इथेच चुकते करणार”; निलेश राणे आक्रमक

  “सशक्त सरकारने सशक्त कारवाई करणे अपेक्षित आहे”; वरूण गांधींचा सरकारला घरचा आहेर

  ‘मुख्यमंत्री साहेब चुका होतात, फक्त जनतेला सांगा की…’; सोमय्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

  Kirit Somaiya: “किरीट सोमय्या म्हणजे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी”