‘तुम्ही ठरवा, आता शिवसेनेची जबाबदारी तुमची’; आमदारांमधील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई | शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी बुधवारी बंडखोर आमदारांना एक पत्र पाठवलं होतं. वर्षा बंगल्यावर 5 वाजता होणाऱ्या बैठकीला हजर राहा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा या पत्रातून बंडखोर आमदारांना देण्यात आला होता.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने आमच्याकडे शिवसेना आमदारांचं जास्त संख्याबळ असल्याचं सांगत सुनील प्रभू यांनाच प्रतोद पदावरून बेदखल केलं होतं.

शिंदे गटाकडून आता त्यांच्या गटाच्या प्रतोद पदाची जबाबदारी महाडचे आमदार भरत गोगावले यांच्यावर देण्यात आली आहे. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये ही सगळी प्रक्रिया सुरु असतानाच्या संभाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओत भरत गोगावले कागदपत्रांवर सही करताना दिसत आहेत. या व्हिडीओत त्यांच्या बाजूला ठाण्यातील माजिवाडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) बसलेले दिसत आहे.

भरत गोगावले यांनी प्रतोद पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रताप सरनाईक म्हणाले की, आता हे प्रतोदाचं काम काय आहे, हे तुम्हाला माहिती आहे ना? आता तुमची जबाबदारी आता वाढली आहे. शिवसेना पक्षाची फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. सर्व आमदारांना टिकवून ठेवा, त्यांना बोलायला द्या, असं सरनाईक यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडताच सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस ट्रोल! 

“आमचा विठ्ठल चांगला, अवतीभवतीच्या बडव्यांमुळे आमचा विठ्ठल बदनाम होतोय” 

मोठी बातमी! मुंबईत उद्धव ठाकरेंच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल 

“हे वादळ दोन दिवसात शांत होईल, सरकार पडणार नाही, आमदारही परत येतील” 

‘पक्ष वाचवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणं अत्यावश्यक’, एकनाथ शिंदे मागणीवर ठाम