हाडं गोठवणाऱ्या थंडीत भारतीय जवानांचा रंगला सामना, व्हॉलिबॉल खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल

श्रीनगर | सध्या सर्वत्र प्रचंड थंडी पसरली आहे. त्यामुळे आता स्वेटर कानटोप्यांशिवाय बाहेर निघणं अवघड झालंय. देशातील सर्वाधिक थंडीचा प्रदेश हिमालयीन पर्वत रांगांमध्ये असते.

उत्तर भारतात तसेच हिमाचल प्रदेशच्या काही भागात मोठ्या प्रमाणात बर्फ पडल्याचं चित्र सध्या दिसत आहे. परिणामी तिथं अनेक अडचणींना तोंड द्याव लागतं आहे.

डोळ्यात तेल घालू प्रत्येक नैसर्गिक संकटाशी झुंजत भारतीय सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी भारतीय सैन्य पार पाडत आलं आहे. अशा थंडीतही भारतीय सैन्याचे जवान पहारा देत आहेत.

हिमालयाच्या भागात मोठ्या प्रमाणात या काळात हिमसख्खलन होतं असतं. बर्फाचा मोठा मारा होत असल्यानं वाहतूक खंडीत होताना आपण पाहिली आहे.

भारतीय सैनिक अशावेळीही कठीण परिस्थितीत मार्ग काढतात. सैनिकांचे अनेक पराक्रमाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

बर्फ पडत असताना मोठ्या कष्टानं आपली ड्युटी करत असताना जवानांचा व्हाॅलिबाॅल खेळतानाचा एक व्हि़डीओ व्हायरल झाला आहे.

जवानांनी बर्फ पडत असलेल्या भागात व्हॉलिबॉल खेळण्यासाठी लागणारी सर्व सामग्री घेऊन तिथं खेळायला सुरूवात केल्याचं दिसत आहे. मोठ्या उत्साहात जवान खेळत आहेत.

जवानांच्या दोन टीम केल्या आहेत आणि दोन्हीकडून एकमेकांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. एकूण 19 सेकंदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत अनेकांनी शेअर केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच जवानांचा रेस्क्यू करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता हा अतिशय चांगला व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ –

महत्त्वाच्या बातम्या –

 “…तर मी आमदारकीचा राजीनामा देईल”; प्रताप सरनाईक यांचं रोखठोक वक्तव्य

राजकीय भाष्य नडलं! ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता 

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

महिलांसाठी LIC ची जबरदस्त योजना; रोज 29 रूपये गुंतवा अन् मिळवा इतके लाख

5 वर्षांची चिमुकली रिपोर्टर पाहिलीत का?; पाहा हफिजाची रिपोर्टिंग