Top news देश

5 वर्षांची चिमुकली रिपोर्टर पाहिलीत का?; पाहा हफिजाची रिपोर्टिंग

viral littel girl e1642070863864
Photo Credit- instagram/s_h_u_b_h_a_m3898

श्रीनगर | सध्या सोशल मीडिया हे एक महत्त्वाचं संवादाचं आणि कामाचं माध्यम झालं आहे. जगामध्ये कोणत्याही कोपऱ्याला काही घडलं की लगेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पोहचतं.

सोशल मीडियावर सध्या एका लहान मुलीचा रिपोर्टिंग करतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या भागातील खराब रस्त्याचा व्हिडीओ या पाच वर्षाच्या चिमुकलीनं अगदी छान पद्धतीनं रिपोर्ट केला आहे.

जम्मू काश्मीरची रहिवासी असणारी पाच वर्षीय हफिजा सध्या आपल्या हटके अंदाजासाठी प्रसिद्ध झाली आहे. हफिजानं आपल्या भागातील विविध समस्यांचा व्हिडीओ बनवण्याचा सपाटा लावला आहे.

रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे, की आमच्या घराकडं कोणी पाहुणे देखील येत नाहीत, असं हफिजा व्हिडीओ काढत असताना म्हणते. परिणामी त्या व्हिडीओला सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे.

हफिजाच्या अंदाजानं आणि तिच्या हावभावामुळं हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अगदी प्रामाणिकपणे हफिजा आपल्या भागातील समस्या मांडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

हफिजाची आई शाइस्ता हिलाला यांनी हफिजाच्या कलेबद्दल अधिक माहिती दिली आहे. हफिजा मोबाईल हाताळण्यात अगदी पटाईत असल्याचं हाफिजा म्हणाल्या आहेत.

हफिजा रस्त्याची अवस्था इतकी वाईट झाल्याचं एका व्यवसायिक पत्रकारासारखं सांगत आहे. हातामध्ये छोटा माईक अगदी व्यवस्थिपणे हाताळताना हफिजा दिसत आहे.

दरम्यान, हफिजाच्या या पत्रकारितेच्या अंदाजातील व्हिडीओला सध्या सर्वत्र व्हायरल केलं जात आहे. परिणामी सोशल मीडियाच्या माध्यमातून जम्मू काश्मीर प्रशासनाला हफिजाच्या या व्हिडीओमुळं जाग येणं अपेक्षित आहे.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Shubham Botre (@s_h_u_b_h_a_m3898)


महत्वाच्या बातम्या-

 श्रेयवादाची लढाई सुरू! राज ठाकरेंचा ‘तो’ जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ; ‘या’ प्रकरणात अंजली दमानिया पुन्हा आक्रमक

भारतातील कोरोना स्थितीबाबत अमेरिकेतील तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

‘… तर घरीच उपचार घ्या’; जाणून घ्या सरकारच्या या मार्गदर्शक सूचना 

“पंतप्रधानांबद्दल बोलताना आपली उंची किती बोलतो किती, हा विचारही राऊतांनी करावा”