ज्यूनिअर-सिनिअर्समध्ये तुंबळ हाणामारी; सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई |  सोशल मीडियाच्या माध्यमातून जगात कुठेही काही घडलं तर अगदी काही वेळात सर्वांना समजतं. दररोज विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात.

सध्या मुंबईतील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधील भांडणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सर्वत्र या व्हिडीओची चर्चा आहे.

सिनिअर्स आणि ज्यूनिअर्स मध्ये कोणत्याही महाविद्यालयात थोड्या प्रमाणात भांडणं होत असतात. पण मोठ्या प्रमाणात मारामारी होत असल्यानं हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

कोरोनाच्या काळानंतर जवळपास दीड वर्षानंतर महाविद्यालय सुरू झाली आहेत. शिक्षणावर भर देण्याऐवजी मारामारी करण्यात विद्यार्थी गुंतल्यानं पालक संतापले आहेत.

मुंबईतील कांदिवली भागातील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये वाद रंगल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.

एका ज्यूनिअरला सातत्यानं सिनिअर्सकडून त्याच्या राहणीमानावरून डिवचण्यात येत असल्याचं काहींचं म्हणणं आहे. परिणामी शेवटी या रॅगिंगचा परिणाम भांडणात झाला.

विद्यार्थ्यांचा एक ग्रुप अचानकपणे एका विद्यार्थ्याला मारायला सुरूवात करतो. एकटाच असल्यानं म्हणावा तितका प्रतिकार तो एकटा करू शकत नाही, असं व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे.

दरम्यान, कांदिवली पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. सदरील मारहाणीच्या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आलेली आहे.

पाहा व्हिडीओ – 

महत्त्वाच्या बातम्या – 

 “The Kashmir Files चित्रपट न पाहणाऱ्यांना 2 वर्ष जेलमध्ये टाका”

 बंपर ऑफर! होळीनिमित्त Hondaच्या गाड्यांवर मिळणार तब्बल 25 हजारांचा डिस्काऊंट

 ‘संपूर्ण जगात याची चर्चा होणार’; करूणा शर्मा यांची मोठी घोषणा

जिओकडून नव्या प्लॅनची घोषणा, अनलिमिटेड कॉलिंगसह नेटही मिळणार! 

कोरोनाचा विस्फोट होऊ लागल्यानंतर मोदी सरकारचा राज्यांना अलर्ट, म्हणाले…