‘काय नाव होतं त्यांचं, काय ते’; बिपीन रावतांना श्रद्धांजली देतानाचा सदावर्तेंचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली | तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात (Helicopter Accident) अखेर सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तशी माहिती संरक्षण दलाकडून अधिकृतपणे देण्यात आली आहे.

बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) आणि अन्य 11 लष्करी अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. रावत यांच्या दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसंच सर्व मृतांच्या कुटुंबियांप्रति आपल्या संवेदना प्रकट केल्या आहेत.

बिपिन रावत यांना श्रद्धांजली अर्पण करतानाचा प्रसिद्ध वकिल गुणरत्न सदावर्ते यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते काय नाव होतं त्यांचं, काय होते ते, असं बिपिन रावत यांच्याबद्दल विचारताना दिसत आहेत.

गुणरत्न सदावर्ते यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी गुणरत्न सदावर्तेना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं आहे.

सदावर्ते तुम्हाला लष्कर प्रमुखाचं नाव माहित नाही, पद माहिती नाही श्रद्धांजली व्हायला लागले…, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी सदावर्तेंना सुनावलं आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत यावर कमेंट प्रतिक्रिया दिली आहे. तसेच बिपिन रावत कोण होते ते त्यांना माहित नाही, हे एस टी कर्मचाऱ्यांचे काय प्रश्न सोडवणार, असंही एका नेटकऱ्याने म्हटलंय.

दरम्यान, सीडीएस बिपीन रावत यांच्या जाण्याने संपूर्ण भारत दु:खात बुडाला आहे. त्यांना अनेक स्तरातून मानवंदना देण्यात येत आहे. बिपीन रावत यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी वाहून घेतलं होतं, त्यांचे वडील सैन्यात होते. तर त्यांची पत्नी गृहिणी असूनही सैन्याच्या परिवारांसाठी एका संस्थेच्या मध्यमातून काम करत होत्या. असे व्यक्तिमहत्व देशाने गमावल्याने फक्त भारतातूनच नाही तर संपूर्ण जगातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

CDS बिपीन रावतांच्या निधनानंतर सोनिया गांधींनी घेतला ‘हा’ निर्णय! 

लष्कराच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपीन रावत यांचं दुर्दैवी निधन! 

बँक ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी; शक्तिकांत दास यांनी केली ‘ही’ घोषणा 

“शरद पवार यांच्या उंचीचा नेता आज देशाच्या राजकारणात नाही” 

‘हा नेता अनिल देशमुखांच्या वाटेनं जाणार’; भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ