राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शरद पवारांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

मुंबई | राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता राज्यात मोठा वाद उद्भवला आहे. सर्व स्तरातून कोश्यारी यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी चौफेर शत्रुंनी घेरलं असताना आपल्या माणसांना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं. स्वराज्य उभं करत असताना वेळोवेळी त्यांना राजमाता जिजाऊंनी मार्गदर्शन केल्याचे दाखले इतिहासात आहेत.

औरंगाबाद येथील आयोजित एका कार्यक्रमात स्वामी रामदास यांच्याशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारतं, असं वादग्रस्त वक्तव्य कोश्यारींनी केलं आहे. स्वामी रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते, असं भगतसिंग कोश्यारी म्हणाले आहेत.

राज्यपाल या वैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीनं अशाप्रकारचं वादग्रस्त वक्तव्य केल्यानं राज्यात आता मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विविध स्तरातून कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली आहे.

कोश्यारी याचं हे वक्तव्य चर्चेत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवाजी महाराजांच्या गुरूंबद्दल केलेल्या वक्तव्याचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

एका कार्यक्रमात शरद पवार यांनी राजमाता जिजाऊ याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू असल्याचं सांगितलं होतं. राजमाता जिजाऊ यांच्याच विचारांनी आणि संस्कारांनी शिवाजी महाराजांना प्रेरणा मिळाल्याचं या व्हिडीओत शरद पवार म्हणत आहेत.

शिवाजी महाराजांचा कालखंड निट अभ्यासला तर रामदास हे गुरू नव्हते हे स्पष्ट होत असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. नेटकरी शरद पवारांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत कोश्यारींना इतिहास समजून घेण्याचा सल्ला देत आहेत.

दरम्यान, समाजात गुरूचे स्थान किती मोठे आहे हे उपस्थितांना समजावून सांगताना कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. परिणामी सध्या राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

पाहा व्हिडीओ – 

 

महत्त्वाच्या बातम्या – 

“…तर धैर्यवर्धन पुंडकरांच्या घरासमोर हात कलम करेन”

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मोदी सरकार लवकरच ‘हा’ निर्णय घेणार 

“अजूनही वेळ गेली नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विचार करावा” 

समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?- भगतसिंह कोश्यारी 

रशिया-युक्रेन युद्धावर आठवलेंची कविता, म्हणाले ‘पुतीनचा बिघडला आहे ब्रेन म्हणून…’