“तुमच्याकडे जय श्रीराम, तर आमच्याकडे सिताराम”

बंगळुरु : कर्नाटकमधील कम्युनिष्ट पक्षाचे नेते बी. व्ही. ककिलाया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मंगळुर येथे युवकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला दिल्ली विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी एका तरुणीने कन्हैय्या कुमार यांना ‘जय श्रीराम’ असं म्हणतं अनेक प्रश्न विचारले. त्या कार्यक्रमात एका तरुणीने जय हिंद म्हणण्याचीही अपेक्षा कन्हैया कुमार यांच्याकडे  व्यक्त केली.  

‘वन नेशन’ धोरणाला तुमचा का विरोध आहे, असाही प्रश्न त्याच तरुणीने कन्हैया कुमार यांना विचारला. त्यावर तुमच्याकडे ‘जय श्रीराम’ आहे तर आमच्याकडे सिताराम आहे, असे म्हणत कन्हैय्या कुमारने त्या तरुणीला उत्तर दिलं आहे.

‘वन नेशन, वन पार्टी’बद्दलच्या प्रश्नावरही कन्हैय्यांनी दिलेल्या उत्तराला सभागृहातील विद्यार्थी दाद घालताना दिसले.

मुळात माझी उत्पत्तीच दोन व्यक्तींपासून झालेली आहे. माझे आई आणि वडिल जेव्हा एकत्र आले, तेव्हाच माझा जन्म झाला. भारताच्या संविधानात 300 पेक्षा जास्त कलम आहेत. आपल्या देशाच्या संसदेतही दोन सभागृहत आहेत, असंही कन्हैय्या कुमार म्हणाले आहेत. 

या सभागृहात देशभरातून येणाऱ्या लोकप्रतिनिधींची संख्याही 545 एवढी आहे. आपली लोकशाही ही ‘युनिटी ऑफ डायवर्सिटी’ या तत्वानुसार चालते, अशा प्रकारे कन्हैय्या कुमारने तरुणींच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

महत्वाच्या बातम्या-

-बीग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकलेंना मिळाली नियमभंगाची शिक्षा

-काश्मीरच्या राज्यपालांनी दिलेलं ‘ते’ आव्हान राहुल गांधींनी स्विकारलं

-“राहुल, सोनिया गांधी स्वत:च्या स्वार्थासाठी काम करतात आणि कॅमेरासमोर येऊन रडतात”

-पश्चिम महाराष्ट्र पूरात असताना मुख्यमंत्री ‘महाजनादेश’ यात्रेत मग्न- प्रकाश आंबेडकर

-धैर्यशील माने यांची पूरग्रस्तांना मदत; उचलली पाठीवर पोती