मुंबई | विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून जालन्याचे युवा नेते राजेश राठोड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. काँग्रेसकडून अनेक दिग्गजांची नावं चर्चेत होती, मात्र पक्षानं त्याऐवजी एका युवा नेत्याला संधी दिली आहे.
राजेश राठोड हे जालना जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत. एनएसयूआयपासूनच ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव म्हणूनही ते संघटनेत काम करत आहेत. विधानपरिषदेच्या एकूण नऊ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यात भाजपनं चार नावांची घोषणा आधीच केलेली आहे.
आघाडीनं पाचचं उमेदवार दिले तर निवडणूक बिनविरोध होईल, सहा उमेदवार दिल्यास मात्र मतदानाची वेळ येणार आहे. काँग्रेस दुसऱ्या जागेसाठीही आग्रही आहे.
विधानपरिषदेसाठी काँग्रेसमध्ये नसीम खान, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेकांच्या नावाची चर्चा होती. मात्र काँग्रेस हायकमांडनं अखेर राजेश राठोड यांच्या नावाला पसंती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-…म्हणून साई पल्लवीने धुडकावलं 2 कोटी रुपयांचं मानधन
-कौतुकास्पद! शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला महिन्याभराचा पगार
-केंद्र सरकार रेल्वे देण्यास तयार, कामगारांना पायी जाण्यापासून रोखा- देवेंद्र फडणवीस
-लॉकडाऊनमुळे राज्यभरात अडकलेल्या नागरिकांना ST मोफत गावी पोहोचवणार; ‘या’ अटींसह प्रवास शक्य
-80 वर्षीय वडिलांना खांद्यावर घेऊन मजुराचा मुलुंड ते वाशिम 350 किमी पायी प्रवास