21 ऑक्टोबरला मतदान, मग मतमोजणी 24 ला का?- छगन भुजबळ

नाशिक : निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मतदान आणि मतमोजणीच्या तारखांमधील तफावतीवर आक्षेप घेतला आहे. विधानसभेचं मतदान ईव्हीएम मशीनने होत आहे, मग मतमोजणी तीन दिवसानंतर का?, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.

दुसऱ्या दिवशीच मतमोजणी का नाही? असा सवाल करतानाच ईव्हीएममध्ये गडबड करण्यासाठी सरकारने दोन दिवस घेतले आहेत का? अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.

निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यानंतर छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे सवाल केले. राज्यात 21 ऑक्टोबरला मतदान होत असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होत आहे. त्यावर भुजबळ यांनी आक्षेप घेतला आहे.

ईव्हीएमबाबत सुरुवातीपासूनच लोकांचा आक्षेप आहे. असं असतााना मतमोजणी आणि मतदानामध्ये तीन दिवसाचे अंतर का ठेवण्यात आले? दुसऱ्या दिवशी मतमोजणी का ठेवली नाही, असं छगन भुबळांनी म्हटलं आहे.

आम्ही सत्तेत असतानाही निवडणुका व्हायच्या. तेव्हा दुसऱ्या दिवशी किंवा फारफार तर त्यानंतर मतमोजणी व्हायची. यावेळी मात्र मतमोजणीत तीन दिवसाचं अंतर ठेवण्यात आलं आहे, असं सांगतानाच सरकारला ईव्हीएममध्ये गडबड करायची तर नाही ना? अशी शंका कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-