मुंबई | विधानपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं असून आता निकाल देखील समोर येत आहेत. मतदान मोजणीपूर्वीच राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे.
विधानपरिषदेत आपले दोन्ही उमेदवार निवडून आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला यश आलं आहे. तर भाजप आणि काँग्रेसमध्ये आता काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
भाजपचे प्रसाद लाड, काँग्रेसचे भाई जगताप व चंद्रकांत हंडोरे यांच्यात चुरसीची लढत पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी झाले असले तरी काँग्रेसमध्ये मात्र चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.
शिवसेनेचे सचिन अहिर व अमिषा पाडवी, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे व रामराजे निंबाळकर विजयी झाले आहेत.
भाजपचे राम शिंदे, उषा खापरे, श्रीकांत भारतीय आणि प्रवीण दरेकर विजयी झाले आहेत.
विधानसभेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात उतरले होते. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
दरम्यान, विधानपरिषदेच्या 10व्या जागेसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये अजूनही चुरसीची लढत पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सोनिया गांधींना रूग्णालयातून डिस्चार्ज, ‘या’ तारखेला ईडीसमोर हजेरी लावणार
अखेर मतमोजणीला सुरूवात, थोड्याच वेळात निकाल समोर येणार
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण